Advertisement

कोलकात्यात डॉक्टरांना मारहाण, मुंबईत 'मार्ड'ने पुकारला संप

कोलकाता ज्युनियर डॉक्टरला पेशंटच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मुंबईसह राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात मार्डचे निवासी डॉक्टर तसंच 'एएसएमआय'चे शिकाऊ डॉक्टर्स निदर्शनं करणार आहेत.

कोलकात्यात डॉक्टरांना मारहाण, मुंबईत 'मार्ड'ने पुकारला संप
SHARES

कोलकात्यात ज्युनियर डॉक्टरला पेशंटच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मुंबईसह राज्यातील निवासी डाॅक्टरांची संघटना असलेल्या 'मार्ड'नेे काम बंद आंदोलन पुकारलं आहे. निवासी डाॅक्टरांनी हातात काळी रिबीन बांधून तसंच हेल्मेट परिधान करून वेगवेगळ्या रुग्णालयात निषेध  केला. राज्यातल्या सार्वजनिक रुग्णालयांतील तब्बल १० हजार डॉक्टर या निषेध आंदोलनात सहभागी झाल्याने आपत्कालीन सेवा वगळता, इतर वैद्यकीय सेवेचा बोजवारा उडाला.  

हृदयविकाराचा झटका

कोलकाता शहरातील एनआरएस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सोमवारी एका वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी एका निवासी आणि एका इंटर्न डॉक्टरला मारहाण केली. डॉ. परिबहा मुखोपाध्याय आणि डॉ. यश टेकवानी अशी या डॉक्टरांची नाव असून रुग्णांच्या नातेवाईकांनी या २ डॉक्टरांना मारहाण केली.

हल्ल्याचा निषेध

महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची संघटना (मार्ड) आणि शिकाऊ डॉक्टरांची संघटना (एएसएमआय) यांनी डॉक्टरांनी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत डॉक्टरांना न्याय देण्यासाठी आम्ही उभे राहणार आहोत, अशी भूमिका घेतली. या दोन्ही संघटना राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात हाताला काळ्या पट्ट्या बांधून आणि डोक्यात हेल्मेट घालून निषेध दर्शवत आंदोलन करत आहेत.



हेही वाचा -

नायर रुग्णालयातून ५ दिवसांचे बाळ चोरीला



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा