देवीचं दर्शनही आॅनलाईन करा, महापालिकेची नवरात्रोत्सव मंडळांना सूचना

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गणेशोत्सवानंतर सर्वांना वेढ लागतात ते नवरात्रौत्सवाचे. पण यावर्षी नवरात्रौत्सवावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे यावर्षी नियमांचं पालन करत नवरात्रौत्सव साधेपणानं साजरा करावा लागणार आहे. राज्य सरकारच्या निर्देशानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)नं शुक्रवार, ९ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबईतील संघटना आणि सर्वजन्य मंडळांना यंदा 'ऑनलाइन दर्शन' देण्याची सूचना केली.

प्रशासनानं एक निवेदन प्रसिद्ध केलं असून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. असं म्हटलं आहे की, COVID चे वाढते रुग्ण पाहता भक्त यावर्षी ऑनलाइन देवीचा आशीर्वाद घेऊ शकतात.

कडक नियम जाहीर करताना राज्य सरकारनं संघटना आणि कुटूंबाला मूर्तीचा आकार अनुक्रमे ४ फूट आणि २ फूट कमी करण्यास सांगितला आहे. सोशल डिस्टनसिंगचं पालन आणि COVID 19च्या सुरक्षा उपायांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितलं आहे.

१७ ऑक्टोबर, २०२० रोजी हा महोत्सव सुरू होईल आणि खबरदारीचा उपाय लक्षात घेऊन मंडळांना नियमितपणे पंडाळ स्वच्छ करावे लागतील. तेथे उपस्थित सदस्यांना दोन फूट अंतर राखून मास्क घालावे लागतील आणि वेळेवर हात धुवावे लागतील.

पुढे, मंडळांना कृत्रिम विसर्जन साइटवर मूर्तींचं विसर्जन करण्यास किंवा पालिका प्रशासनाच्या सदस्यांशी समन्वय साधण्यास सांगितलं गेलं आहे. गरबा, दांडिया आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई आहे. आरती, भजन, कीर्तन किंवा इतर धार्मिक कार्यक्रमांना कोणतीही गर्दी नसावी.


हेही वाचा

मेट्रो ३ साठी अमेरिकेतून आणले वेल्डींग मशिन

मुंबईतील घरविक्री निम्म्याने घसरली

पुढील बातमी
इतर बातम्या