Advertisement

मुंबईतील घरविक्री निम्म्याने घसरली

गेल्या वर्षीच्या (२०१९) तिमाहीच्या तुलनेत यावर्षीच्या (२०२०) प्रत्येक तिमाहीत मुंबईतील घरांची विक्री जवळपास निम्म्याने घसरली आहे.

मुंबईतील घरविक्री निम्म्याने घसरली
SHARES

गेल्या वर्षीच्या (२०१९) तिमाहीच्या तुलनेत यावर्षीच्या (२०२०) प्रत्येक तिमाहीत मुंबईतील घरांची विक्री जवळपास निम्म्याने घसरली आहे. त्याला प्रामुख्याने कोरोना आणि लाॅकडाऊनचा फटका कारणीभूत असला, तरी राज्य सरकारने देऊ केलेल्या सवलतींमुळे हळुहळू घर खरेदी सुधारत असल्याचं नाईट फ्रँक इंडिया या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आलं आहे. (sales drop in mumbai real estate market says knight frank report)

नाईट फ्रँकच्या इंडियन रिअल इस्टेट (जुलै ते सप्टेंबर, २०२०) या अहवालानुसार २०१९ मध्ये प्रत्येक तिमाहीत मुंबईत १५,२३६ घरांची विक्री झाली होती. ही विक्री निम्म्याने घटून ७,६३५ इतकी खाली आली आहे. गेल्या वर्षी मुंबईत १९,९५३ इतक्या नवीन घरांची उभारणी करण्यात आली होती. त्यात यावर्षी ५८ टक्के घट झाली असून शहरात केवळ ८,३८९ नवीन घरांचं बांधकाम सुरू आहे. 

कोरोनाची भीती हळुहळू दूर होत असून मिशन बिगीन अगेन अंतर्गत इतर व्यवहार देखील पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे मुंबईतील घरांच्या खरेदी-विक्रीला चालना मिळताना दिसत आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची आकडेवारी फारशी दिलासादायक नाही, असंच म्हणावं लागेल. 

हेही वाचा - भविष्यात मिरा भाईंदर, घोडबंदर व दहिसर एकमेकांना जोडणार

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) मुंबईत केवळ २,६८७ घरांची विक्री झाली होती. तर सप्टेंबर अखेरीस संपलेल्या तिमाहीत शहरात ७,६३५ घरांची विक्री झाली आहे. याचाच अर्थ पहिल्या तिमाहीच्या तुलनेत घरविक्री थोडीफार सुधारली आहे.

या अहवालानुसार मुंबईमध्ये पुण्याच्या तुलनेत नवीन घर उभारण्याचं प्रमाण आणि घर विक्रीचं प्रमाण देखील जास्त आहे. पुण्यात गेल्या वर्षी तिमाहीतील घरांची सरासरी विक्री ८,२२२ होती. ती यंदा ६० टक्के कमी (४९१८) इतकी कमी झाली आहे. तर, नव्या गृहप्रकल्पांतील घरांची संख्या ११,१६५ वरून ६७२१ (६० टक्के) इतकी कमी झाली आहे.

महाराष्ट्र सरकारने दिलेली मुद्रांक शुल्कातील सवलत, कमी व्याजदर, घरांच्या कमी झालेल्या किमती आणि विकासकांनी दिलेल्या आकर्षक सवलतींमुळे गृहविक्रीला चालना मिळत असल्याचं नाईट फ्रँकच्या मुख्य आर्थिक सल्लागार रजनी सिन्हा यांनी सांगितलं. 

पित्रृपंधरवड्यात घर खरेदीचं प्रमाण वाढल्यास येऊ घातलेला दसरा आणि दिवाळी या सणांच्या काळात घरविक्रीत उत्तम वाढ नोंदविली जाईल, अशा अपेक्षा नाईक फ्रँकचे व्यवस्थापकीय संचालक शिरीष बैजल यांनी व्यक्त केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा