Advertisement

मेट्रो ३ साठी अमेरिकेतून आणले वेल्डींग मशिन

फ्लॅश बट वेल्डींग मशीनद्वारे मेट्रो ३ मार्गाच्या रुळ जोडणीच्या कामास छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थानक येथून शुक्रवारपासून सुरूवात करण्यात आली.

मेट्रो ३ साठी अमेरिकेतून आणले वेल्डींग मशिन
SHARES
मेट्रो ३ साठी रुळ जोडणार फ्लॅश बट वेल्डींग मशीन अमेरिकेतून आणण्यात आलं आहे. हे मशीन मुंबईत दाखल झाले आहे. फ्लॅश बट वेल्डींग मशीनद्वारे मेट्रो ३ मार्गाच्या रुळ जोडणीच्या कामास छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थानक येथून शुक्रवारपासून सुरूवात करण्यात आली. मेट्रो ३ साठी दोन फ्लॅश बट वेल्डिंग मशिन्सच्या वापर होणार आहे. दुसरे मशिन नोव्हेंबर अखेरीस मुंबईत दाखल होईल.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावर मेट्रो ३ धावणार आहे. मेट्रो ३ मार्गासाठी हेड हार्डन्ड रुळांच्या वापर होणार आहे. फ्लॅश बट वेल्डींग मशिनद्वारे ३४० फ्लॅश व्होल्टेज व ४२० बुस्ट व्होल्टेज चा वापर करून अलाइनिंग, प्री-हिटिंग, फ्लॅशिंग, फॉर्जिंग, स्ट्रीपिंग व एअर-क्वेंचिंग या प्रक्रिया करून रुळांचे वेल्डींग करण्यात येणार आहे. हे मशीन अमेरिकेतील मे. हॉलंड एल पी या कंपनीने बनवलं आहे.  

मेट्रो ३ साठी १०,७४० टन हेड हार्डन्ड रुळांची आवश्यकता असून अद्याप ८३६६ टन रूळ मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला प्राप्त झाले आहेत. उर्वरीत रूळ लवकरच जपानहून मुंबईत दाखल होणार आहेत. फ्लॅश बट वेल्डींग मशीनच्या सहाय्याने १८ मीटर लांबीच्या हेड हार्डन्ड रुळांचे वेल्डिंग करून अखंड रूळ तयार करण्यात येणार आहे. 



हेही वाचा - 

मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर धावणार लोकल?

मुंबई लोकलबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला सूचना



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा