Advertisement

मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर धावणार लोकल?

सद्यस्थितीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ४३१ रेल्वे फेऱ्या चालवण्यात येतात.

मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर धावणार लोकल?
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल सेवा (mumbai local) केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू आहे. मात्र, या लोकल सेवेला सर्व स्थानकांवर थांबा नसून, मोजक्याच स्थानकावर थांबा असल्यामुळं प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळं सर्व स्थानकांत थांबा देण्यासाठी धीम्या मार्गावरही उपनगरी रेल्वे (local) चालविण्याचा विचार सुरू असून, लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मध्य रेल्वेच्या (central railway) मुख्य, हार्बर आणि ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावर अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू आहे. सद्यस्थितीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ४३१ रेल्वे फेऱ्या चालवण्यात येतात. या गाड्यांना सीएसएमटी, दादर, भायखळा, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, नेरळ, आसनगाव, पनवेल, मानखुर्द, वडाळा, रबाळे, कोपरखैरणे, तुर्भे, जुईनगर, नेरुळ, बेलापूर, वाशी, पनवेल या स्थानकांतच थांबा दिलेला आहे. त्यामुळे मधल्या स्थानकांतील प्रवाशांना त्याचा फायदा होत नाही.

सध्या मध्य रेल्वेवरील एकूण ४३१ फेऱ्यांपैकी सीएसएमटी ते कल्याण, कर्जत, कसारा मार्गावर ३३३ फेऱ्या होतात. यातील ८ फेऱ्या धीम्या मार्गावर चालवण्याचे नियोजन असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं मध्य रेल्वे धीम्या मार्गावर लोकल चालवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा - 

आता खासगी बसमधूनही १०० टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी

रेल्वेत प्रवास करण्याची परवानगी मिळाली, पण डबेवाले क्यूआर कोडमुळे त्रस्त



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा