अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिकेची कारवाई, 'इतक्या' हातगाड्या तोडल्या

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अनधिकृत फेरीवाल्यांच्या तब्बल ४ हजार ३०० चारचाकी हातगाड्यांवर मुंबई महापालिकेनं कारवाई केली आहे. मुंबईतील एकूण २४ प्रभागांमध्ये कारवाई करत महापालिकेनं हातगाड्या ताब्यात घेतल्या होत्या. या हातगाड्या जेसीबी मशीनद्वारे तोडून टाकण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं १६ नोव्हेबरपासून अनधिकृत हातगाड्या जप्त करायला सुरुवात केली होती. या कारवाईत सर्वात जास्त ३१९ हातगाड्या अंधेरीमधून जप्त करण्यात आल्या. कुर्ल्यामधून २५२, तसंच, चेंबूरमधून २१२ हाजगाड्या जप्त करण्यात आल्या.

फेरीवाल्यांवर कारवाई

महापालिकेद्वारे याआधी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत जप्त करण्यात आलेल्या हातगाड्या दंड भरल्यानंतर परत दिल्या जात होत्या. परंतु, आता त्या नष्ट करण्यात येत आहेत. त्यामुळं अनधिकृत फेरिवाल्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये छोटे व्यवसाय करण्यासाठी फेरिवाले हातगाड्यांचा वापर करतात. मात्र. त्यांच्या या हातगाड्यांमुळं वाहतुकीला अडथळे निर्माण होत असतात. तसंच, पादचाऱ्यांची चालतानाही गैरसोय होते. तर, कधी अपघातही होतात.

कारवाई अधिक कठोर

ही बाब लक्षात घेत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं आपली कारवाई अधिक कठोर केली. या कारवाईअंतर्गत ३० नोव्हेंबरपर्यंत मागील २ आठवड्यांपर्यत सुमारे ४ हजार ३०० हातगाड्या महापालिकेनं कारवाईअंतर्गत जप्त केल्या होत्या. त्यानंतर त्या तोडून टाकण्यात आल्या. मुंबईतील रेल्वे स्टेशन आणि बाजारांमधील अतिशय गर्दीच्या ठाकाणी फिरत असलेल्या अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत सर्वसामान्य नागरिकांसाठी रस्ते मोकळे करण्याच्या उद्देशानं महापालिकेनं ही कारवाई सुरू केली आहे.


हेही वाचा -

दुरुस्ती कामामुळं कोकण रेल्वेवरील गाड्या उशिरानं धावणार

कचऱ्याच्या डब्यात धुतले चहाचे कप, व्हिडीओ व्हायरल


पुढील बातमी
इतर बातम्या