Advertisement

दुरुस्ती कामामुळं कोकण रेल्वेवरील गाड्या उशिरानं धावणार

कोकण रेल्वे मार्गावरील अडवली स्थानकामध्ये २७ व २८ डिसेंबर रोजी मध्यरात्री कामं करण्यात येणार आहेत.

दुरुस्ती कामामुळं कोकण रेल्वेवरील गाड्या उशिरानं धावणार
SHARES

कोकण रेल्वे मार्गावरील अडवली स्थानकामध्ये २७ व २८ डिसेंबर रोजी मध्यरात्री कामं करण्यात येणार आहेत. या दुरूस्तीच्या कामामुळं मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्या विलंबनानं धावणार आहेत. तब्बल २५ ते ३० मिनिटं उशिरानं धावणार असल्यानं विकेंडला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे.

उशिरानं धावणाऱ्या गाड्या

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते मंगळुरू एक्स्प्रेस, सीएसएमटी ते मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस, दादर ते सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव डबलडेकर एक्स्प्रेस, मडगाव ते रत्नागिरी पॅसेंजर, रत्नागिरी ते मडगाव पॅसेंजर, एर्नाकुलम ते निझामुद्दीन मंगला एक्स्प्रेस, कोचुवली ते इंदौर एक्स्प्रेस, गांधीधाम ते नागरकोइल एक्स्प्रेस, कोचुवली ते डेहराडून एक्स्प्रेस या एक्स्प्रेस उशिरानं धावणार आहेत.

अखेरचा विकेंड

२०१९ वर्षातील अखेरचा विकेंड असल्यामुळं अनेकांनी कोकणात जाण्यासाठी बुकिंग केलं आहे. तसंच, अनेकांनी गोव्याला जाऊन ३१ साजरा करण्यासाठी मोठी तयारी केली आहे. परंतु, गाड्या उशिरानं पोहोचणार असल्यानं प्रवाशांच्या उत्साहात नाराजी पसरली आहे.



हेही वाचा -

कचऱ्याच्या डब्यात धुतले चहाचे कप, व्हिडीओ व्हायरल

आॅनड्युटी मृत्यूझाल्यास पोलिस वारसांना मिळणार ५० हजार रुपयांची मदत



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा