आॅनड्युटी मृत्यू झाल्यास पोलिस वारसांना मिळणार ५० हजार रुपयांची मदत

वारसांना ५० हजार रुपयांची मदत पोलिस महासंचालक विशेष सहाय्यता निधीतून दिली जाणार

आॅनड्युटी मृत्यू झाल्यास पोलिस वारसांना मिळणार ५० हजार रुपयांची मदत
SHARES

तणावदर्शक परिस्थितीत ही मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांवर अनेकदा काळाची झडप पडते. त्यावेळी मृत पोलिसाच्या कुटुंबियांना आतापर्यत शासनाकडून तुटपूंज मदत मिळत होती. मागील अनेक दिवसांपासून या निधीत वाढ व्हावी अशी मागणी अनेक दिवसांपासून पोलिस कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती. त्याआधारे ‘ऑनड्युटी’ असताना एखाद्या पोलिस कर्मचाऱ्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना ५० हजार रुपयांची मदत आता  पोलिस महासंचालक विशेष सहाय्यता निधीतून दिली जाणार आहे.

हेही वाचा ः- CAA विरोधात धारावी, मालवणीत मोर्चे

ड्युटीच्या दीर्घ व अनियमित तासांमुळे त्रासलेल्या मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचे आँनड्युटी नैसर्गिक मृत्यू झाल्याच्या घटना दिवसेंदिवस कानावर पडत आहेत. याअगोदर कामावर असताना एखाद्या पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याला शासनातर्फे अनुदान, विम्याची रक्कम आणि पोलिस कल्याणनिधीतून मदत दिली जाते. परंतु, आता कुटुंबियांना या व्यतिरिक्त ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. पोलिस कल्याण निधीची रक्कम अतिशय तुटपूंजी असल्यामुळे या निधीत वाढ करावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून पोलिस कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती. परंतु, ही मागणी मान्य होत नव्हती. अखेर मागील महिन्यात महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी ही मागणी मान्य केली. त्यानुसार, मृत पोलिस कर्मचाऱ्यांचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. जयस्वाल यांनी राज्यातील पोलीस घटक प्रमुखांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

हेही वाचाः- ‘थर्टी फस्ट’साठी बनावट दारू मुंबईत

या निधीचा लाभ घेण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्याच्या वारसांनी संबंधित पोलिसांचे मृत्यूचे प्रमाणपत्र, त्यांच्या कायदेशीर वारसदारांच्या नोंदीबाबतचा अभिलेख, घटक प्रमुखांच्या बँक खात्याबाबतची माहिती, आदी कागदपत्रे पोलिस महासंचालक कार्यालयात पाठवायची आहेत. शासनातर्फे विविध घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांना विविध स्वरुपाची मदत दिली जात होती. परंतु, नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांना मिळणाऱ्या मदतीची रक्कम अतिशय कमी होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळते.


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा