Advertisement

CAA विरोधात धारावी, मालवणीत मोर्चे

मुंबईतल्या २ ठिकाणी आंदोलनं करण्यात आली आहेत.

CAA विरोधात धारावी, मालवणीत मोर्चे
SHARES

सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात मुंबईतील ग्रॅण्टरोड येथील ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन झालं. त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईतल्या २ ठिकाणी आंदोलनं करण्यात आली आहेत. धारावी आणि मालवणीमध्ये विविध संघटनांच्यावतीनं सुधारीत नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधात मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येनं नागरिकांनी या मोर्चात उपस्थिती दर्शवली होती. तसंच, विविध समाजघटकांनी देखील मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देत सहभाग घेतला होता.

एकतेला तडा

धारावी येथील ९० फूट रोडवर सुमारास मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी स्थानिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला होता. भाजप सरकारनं मंजूर केलेला सुधारीत नागरिकत्व कायदा हा संविधानविरोधी असल्याचा आरोप मोर्च्यातील वक्त्यांनी केला. देशातील विविधतेतील एकतेला तडा देण्याचं काम सरकार करत आहे. मनुवादी विरोधी संविधानाचं रक्षणकर्ते अशी वैचारिक लढाई असल्याचं सहभागी वक्त्यांनी सांगितलं.

फूट पाडण्याचं काम

देशात बेरोजगारी, आर्थिक मंदी, महागाई यांसारखे लोकांच्या आयुष्याशी निगडीत प्रश्न निर्माण झालं आहे. हे प्रश्न सोडवण्यास केंद्र सरकार अपयशी ठरलं असून, लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम करत असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून करण्यात आला. जामिया मिलियासह देशभरातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध यावेळी करण्यात आला.

कायदा रद्द करण्याची मागणी

मालवणीमध्ये ही सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात मोठा मोर्चा झाला. या मोर्चात १० हजार स्थानिकांनी सहभाग घेतला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आप यांच्यासह विविध संघटनांनी या मोर्चात सहभाग घेतला होता. त्यावेळी सुधारीत नागरिकत्व कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली.



हेही वाचा -

विले पार्ले इथल्या इमारतीत आग, अग्निशमन दलाच्या ८ गाड्या दाखल

मुंबईतल्या 'या' ५ चर्चमध्ये साजरा करा ख्रिसमस



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा