Advertisement

विले पार्ले इथल्या इमारतीत आग, अग्निशमन दलाच्या ८ गाड्या दाखल


विले पार्ले इथल्या इमारतीत आग, अग्निशमन दलाच्या ८ गाड्या दाखल
SHARES

विले पार्लेतल्या बजाज रोड इथं एका इमारतीत आग लागल्याची माहिती समोर आली आहे. संध्याकाळी ७ वाजता ही घटना घडली.  लाभ श्रीविला असं या इमारतीचं नाव असून १४ मजली इमारत आहे. सध्या आग ही ६ व्या मजल्यावर लागली आहे. 

घटनास्थळी मुंबई अग्निशमन केंद्रच्या ८ गाड्या, ५ जंबो वॉटर टँकर, ३ टी. टी. एल., १-सी. पी., १-बी. ए. व्हॅन, १-एच.पी. आणि १-ॲम्बुलन्स उपस्थित आहेत. सदरची आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अडकलेल्या लोकांचे बचावकार्य सुरू असून सदर घटनेत अद्याप कोणालाही दुखापत नाही, अशी माहिती मुंबई अग्निशमन केंद्रातून मिळाली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा