ख्रिसमस निमित्त अनेक कार्यक्रमाचं आयोजन मुंबईत केलं जातं. मुंबईतल्या अनेक चर्चमध्ये पारंपारिक पद्धतीनं नाताळ साजरा केला जातो. तुम्ही खास नाताळसाठी मुंबईत येताय? मुंबईत जर पारंपरिक पद्धतीनं नाताळ साजरा करण्यासाठी चर्च शोधत आहात? मग तुमच्यासाठी आम्ही काही मुंबईतील प्रसिद्ध चर्चविषयी सांगणार आहोत.
अफगाण चर्च म्हणून ओळख असलेल्या या चर्चची बांधणी ब्रिटिशांनी केली आहे. १८३५ ते १८४३ या काळात झालेल्या अफगाण युद्धात अनेक सैनिकांचे त्यांचे प्राण गमावले होते. या सैनिकांच्या मृत्यूप्रतिर्थ हा चर्च बांधण्यात आला होता. म्हणूनच या चर्चला अफगाण चर्चही म्हणतात.
हेरिटेज वास्तू म्हणूनही या चर्चची ओळख आहे. नाताळच्या पूर्वसंध्येला वाईल्ड वॉईस चॉयर यांच्याकडून कॅरोलचं गायन १०.३० च्या दरम्यान सुरू होते.
कुठे : नेवी नगर, कुलाबा
संपर्क : (२२) २२൦२൦४२൦
१५७२ साली इंग्लडमध्ये हा चर्च बांधण्यात आला होता. त्यानंतर थेट भायखळ्यात १९१० साली हा चर्च शिफ्ट करण्यात आला. १९१३ साली हे बांधकाम पूर्ण झालं.
चर्चचा भलामोठा टॉवर आणि त्याच्या आजूबाजूला आणखी ४ टॉवर इथं बांधण्यात आले आहेत. नाताळसाठी नाताळच्या पूर्वसंध्येला ११.३० वाजता इथं कॅरोल गायन सुरू होतं.
कुठे : संत सावता मार्ग, भायखळा
संपर्क : (२२) २३७२६६३०
१६ व्या शतकात बांधलेले हे चर्च भारतातील जुन्या चर्चपैकी एक आहे. १९७३ साली या चर्चचे दुरुस्तीकरण करण्यात आलं. जुने चर्च असल्यामुळे मुंबईतील अनेक ख्रिस्ती बांधव इथे येत असतात.
तसंच, मुंबईला भेट देणारे पर्यटकही इथं नाताळच्या कॅरोल गायनाला उपस्थित राहतात. नाताळसाठी हे चर्च आकर्षक रोषणाईनं उजळून निघतं. त्याचप्रमाणे बाहेरचा परिसरही जत्रेमुळे बहरून येतो.
कुठे : लेडी शमशेदजी रोडच्या कोपऱ्यावर, माहीम कॉज वे, माहीम बस डेपोच्या समोर, माहीम
संपर्क : (२२) २४४५४४८३
गॉथिक स्थापत्यशैलीचा नमुना असलेली ही बॅसिलिका १९०४मध्ये बांधण्यात आली. पांढ-या आणि गडद राखाडी रंगाचा उपयोग मोठ्या कलात्मकतेने केला आहे. आत प्रवेश करताच समोरची मेरीची विलोभनीय मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. निळी पांढरी रंगसंगती, कोरलेली कलाकुसर आणि आकर्षक फुलांची केलेली सजावट आपल्याला क्षणभर तिथेच खिळवून ठेवते.
आजूबाजूच्या भिंतींवर येशू ख्रिस्ताची महती सांगणारी चित्रं रंगवलेली दिसतात. मुंबईतले सगळ्यात मिडनाईट माससाठी माऊंस मेरी बॅसिलिका चर्च प्रसिद्ध आहे. एका हिलवर हे चर्च असल्याने बॅण्ड स्टण्डचा सुंदर नजाराही इथून दिसतो.
कुठे : माऊंट मेरी रोड, बँडस्टँड जवळ, वांद्रे (प.)
संपर्क : (२२) २६४२३१५२
मुंबई उपनगरातील हे सगळ्यात महत्त्वाचे चर्च आहे. मुंबईतील जुने चर्च म्हणूनही या चर्चकडे पाहिले जाते. इकडे नाताळ मासही तितकाच प्रसिद्ध आहे. वर्षभरात १२ हजाराहून अधिक लोक इथं भेट देतात.
नाताळसाठी ९.३०च्या दरम्यान इथं कॅरोल सुरू होतो. तर नाताळ मास १० वाजताच्या दरम्यान सुरू होतो.
कुठे : आयसी कॉलनी, लक्ष्मण म्हात्रे रोड, बोरीवली (प.)
संपर्क : (२२) २८९३१३६०, २८९२१८४६
हेही वाचा