कचऱ्याच्या डब्यात धुतले चहाचे कप, व्हिडीओ व्हायरल

कॅन्टिन चालकाचा कर्मचारी कचऱ्याच्या डब्यात चहाचे कप धुवत असल्याच्या प्रकार मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकात घडला.

कचऱ्याच्या डब्यात धुतले चहाचे कप, व्हिडीओ व्हायरल
SHARES

कॅन्टिन चालकाचा कर्मचारी कचऱ्याच्या डब्यात चहाचे कप धुवत असल्याच्या प्रकार मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकात घडला. या घटनेचा व्हिडीओ सध्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओची रेल्वे प्रशासनानं गंभीर दखल घेतली आहे. तसंच, या प्रकरणाची चौकशी करून प्रशासनाकडून संबंधित कॅन्टिन चालकास १ लाखाचा दंड करण्यात आल्याची माहिती मिळते.

चुकांची गंभीर दखल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हा कर्मचारी कचऱ्याच्या डब्यात चहाचे कप धुवत असल्यातं स्पष्ट दिसत आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर हा प्रकार घडला आहे. कचरा डबा स्वच्छ धुवून त्यानंतर त्यात कप धुतले जात असल्याची सारवासारव कॅन्टिन चालकाकडून करण्यात आली. परंतु त्याच्या चुकांची गंभीर दखल घेऊन या प्रकरणी रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून संबंधित कॅन्टिन चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

दंडात्मक कारवाई

काही दिवसांपूर्वीच मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकावरील लिंबू सरबत विक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे स्थानकातील लिंबू सरबत विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. तसंच संबंधित कॅन्टिन चालकावरही दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. असे प्रकार वारंवार घडत असल्यानं प्रवाशांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.



हेही वाचा -

CAA विरोधात धारावी, मालवणीत मोर्चे

‘थर्टी फस्ट’साठी बनावट दारू मुंबईत



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा