मुंबई, तुला झाडांवर भरवसा नाय काय? वर्षाला 31 कोटी खर्च, तरीही पडझड!

  • सचिन धानजी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

चेंबूरमध्ये झाड पडून एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर एकप्रकारे झाडांची भीतीच मुंबईकरांच्या मनात घर करून आहे. परंतु खड्डे आणि नालेसफाईवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही मुंबईकरांना दिलासा मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. तसेच आता झाडांच्या बाबतीत झाले आहे. झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यासाठी या वर्षी 31.55 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. परंतु, ही छाटणी होऊनही जून 2017पासून आतापर्यंत 1200 झाडांच्या फांद्या, तसेच झाडे उन्मळून पडली आहेत. अशा दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ३ जणांचे बळी गेले असून तीन ते चार जण जखमीही झाले आहेत.

दोन महिन्यांतच १३०० झाडे पडली

मुंबईत पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या कापून त्यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जातो. जेणेकरून पावसाळ्यात वादळ-वारा आणि मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून पडू नयेत, त्यांच्या फांद्या तुटून पडून नयेत. त्यामुळे या पावसापूर्वी झाडांच्या फांद्या कापण्यासाठी दोन वर्षांकरता 63 कोटींचे कंत्राट देण्यात आले असून 24 प्रशासकीय विभागात स्वतंत्र कंत्राटदार नियुक्त केले आहेत. 

चालू वर्षात 31.55 कोटींचे कंत्राट दिले असून त्यांनी आतापर्यंत किती झाडांच्या फांद्या छाटल्या? याची माहिती उद्यान अधिक्षक विभागातील कर्मचारी लपवत आहेत. 1 जून ते 25 जुलै 2017 या कालावधीत शहर भागात 334, पूर्व उनगरात 325 आणि पश्चिम उपनगरात 665 झाडे उन्मळून पडण्याच्या आणि फांद्या तुटून पडण्याच्या घटना घडल्या आहेत.

झाडे पडल्यानंतर छाटणी!

झाड पडून किंवा फांद्या तुटून कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून कंत्राटदार नियुक्त केले असले, तरी हे कंत्राटदार झाडे पडल्यावर व फांदी तुटून पडल्यावर छाटणी करतात. पडलेल्या झाडांच्या फांद्या आणि खोड घेऊन जातात. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही मुंबईत मनुष्यहानी, वित्तहानी होतच आहे.

झाडांचे ज्ञान नसले कंत्राटदार

महापालिकेने जे 24 कंत्राटदार नेमले आहेत, त्यातील उद्यान विषयक माहिती असणारे केवळ 2 ते 3 च आहे. उर्वरित सर्व सिविल कंत्राटदार आहेत. डिपॉजिट भरायला पैसे आणि ट्रक, कटरमशीन आहे, त्या आधारे त्यांनी कंत्राटे मिळवली आहेत. झाडांच्या फांद्यांचा कचरा हा संबंधित कंत्राटदाराने उचलणे बंधनकारक आहे. परंतु, हा झाडांचा कचराच महापालिकेच्या कचरा गाड्यांतून उचलला जातो. परिणामी दैनंदिन कचरा उचलला जात नाही.

आता झाडे कापणीला सुरुवात

आतापर्यंत किती झाडांच्या फांद्या छाटल्या, याबाबत उदयान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांना विचारण्याचा प्रयत्न केला असता, सध्या आम्ही पोलिस केस आणि कोर्ट केसमध्ये व्यस्त आहोत, ही माहिती आम्हाला देता येणार नाही, असे उत्तर देऊन ते मोकळे झाले. मात्र, चेंबूर घटनेनंतर मुंबईतील झाडांच्या छाटणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.

विभाग कार्यालयांसाठी नेमलेले कंत्राटदार

पालिका विभागकंत्राटदारकंत्राटाची रक्कम
ए वॉर्ड

खांडेश्वर टोइंग

96.46 लाख

बी वॉर्ड

धनश्री गार्डन डेव्हलपर्स

38.36 लाख

सी वॉर्ड

विकास एंटरप्रायजेस

19.18 लाख

डी वॉर्ड

राठोड पोटरीज अँड नर्सरीज

1.38 कोटी

ई वॉर्ड

विरल असोसिएट

82.64 कोटी

एफ/दक्षिण

रिद्धी एंटरप्राइजेस

1.75 कोटी

एफ/उत्तर

न्यू पार्क सन गार्डन

1.42 कोटी

जी/ दक्षिण

एस पोळ एंटरप्राइजेस

1.21 कोटी

जी/उत्तर

एन. के. शाह इन्फ्रा प्रोजेक्ट

2.12 कोटी

एच /पूर्व

तिरुपती इंजिनियर

1.36 कोटी

एच /पश्चिम

टेन कन्स्ट्रक्शन

1.81 कोटी

के/पूर्व

अर्थ सल्व्हेजिंग

1.80 कोटी

के/पश्चिम

तिरुपती कन्स्ट्रक्शन

1.75 कोटी

पी/दक्षिण

रणछोड रामजी वासता कुंभार

1.38 कोटी

पी/उत्तर

यश वृषभ ब्रदर्स

1.42 कोटी

आर/दक्षिण

मगन कन्स्ट्रक्शन

1.65 कोटी

आर/ मध्य

मेसर्स ग्रीन लँड

1.56 कोटी

आर/ उत्तर

अमेय एंटरप्राइज

92.22 लाख

एल

पॉप्युलर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस

90.37 लाख

एम/पूर्व

पंचरत्न प्लास्टिक

1.30 कोटी

एम/ पश्चिम

रावेची अॅग्रो प्रॉडक्ट्स

1.30 कोटी

एन

(रचकोन इन्फ्रा

1.41 कोटी

एस

जय मल्हार हायरिंग सर्व्हिस

1.19 कोटी

टी

कमल एंटरप्राइजेस

1.31 कोटी


हेही वाचा

व्हायरल व्हिडिओ - झाड पडून महिलेचा मृत्यू

एका झाडाचा बळी?


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या