'या' १० वॉर्डमध्ये ४६ टक्के कोरोना रुग्ण, पालिका देणार विशेष लक्ष

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं आता १० वॉर्ड्सवर लक्ष केंद्रित केलं आहे. या १० वॉर्ड्समध्ये ४६ टक्के इतके कोरोनाचे रुग्ण असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पालिका आता या १० वॉर्ड्समधल्या रुग्णांवर अधिक लक्ष देईल. सोमवारी म्हणजेच १७ ऑगस्टपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

पालिकेनं हे वॉर्ड्स निवडण्याआधी काही निकश ठेवले होते. कोरोनव्हायरस प्रकरणांच्या वाढीचा दर, दुप्पट दर, सकारात्मकता दर आणि मृत्यू दराच्या आधारे या १० वॉर्ड्सची निवड करण्यात आली आहे. यात आर उत्तर (दहिसर), आर दक्षिण (कांदिवली), आर सेंट्रल (बोरिवली), एस (भांडुप), एन (घाटकोपर), टी (मुलुंड), जी उत्तर (दादर-माहीम), एम पूर्व (गोवंडी), पी उत्तर (मालाड) आणि एल (कुर्ला) या वॉर्ड्सचा समावेश आहे.

हेही वाचा : भाजपा नेते निलेश राणे यांना कोरोनाची लागण

पालिकेनं यापूर्वी शाहजीराजे भोसले कॉम्प्लेक्समध्ये 'मिशन झिरो' ही नवीन योजना सुरू केली होती. त्यानंतर ही नवीन रणनीती समोर आली आहे. या कार्यक्रमांतर्गत रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यासाठी शहरातील मोबाइल व्हॅननी शहरातील अनेक ठिकाणी भेट दिली. या मोबाईल दवाखान्यात रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यासाठी मुलुंड, भांडुप, अंधेरी, मालाड, बोरिवली, दहिसर आणि कांदिवली भागात २ ते ३ आठवडे भेट देणार.

दरम्यान, रविवारी राज्यात रविवारी कोरोने २८८ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत रविवारी दिवसभरात १०१० नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रविवारी दिवसभरात ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

राज्यात आज ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७० टक्के एवढे आहे. आज ११ हजार १११ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५८ हजार ३९५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


हेही वाचा

मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ८६ दिवसांवर

राज्यात ११ हजार १११ नवे रुग्ण, २८८ जणांचा मृत्यू

पुढील बातमी
इतर बातम्या