Advertisement

मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ८६ दिवसांवर

मुंबईमधील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ८६ दिवसांवर पोहोचला असून कोरोना रुग्णवाढीचा दर ०.८१ टक्के झाला आहे.

मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ८६ दिवसांवर
SHARES

मुंबईतील कोरोना नियंत्रणात येत आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ८६ दिवसांवर गेला आहे. तर रुग्णवाढीचा दरही कमी झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या लाखाच्या पुढे गेली आहे. बुधवारी ९२३ रुग्ण बरे झाले आहेत. तर दिवसभरात ५० जणांचा मृत्यू झाला.

मुंबईमधील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ८६ दिवसांवर पोहोचला असून कोरोना रुग्णवाढीचा दर ०.८१ टक्के झाला आहे. सध्या मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या १ लाख २६ हजार ३७१ झाली आहे. यापैकी १ लाख ७० रुग्ण बेर झाले आहेत. बरे होण्याचं प्रमाण ७९ टक्क्यांवर पोहोचलं आहे. सध्या मुंबईत १९ हजार ६४ रुग्ण उपचार घेत आहेत.

मुंबईत आतापर्यंत एकूण ६ हजार ९४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी मृत्यू झालेल्या ५० जणांमध्ये ३० पुरुष, तर २० महिलांचा समावेश होता. मृत्यू झालेल्यांपैकी तिघांचे वय ४० वर्षांपेक्षा कमी, तर ३० जणांचे वय ६० वर्षांहून अधिक आणि १७ जण ४० ते ६० वयोगटातील होते.

ईशान्य मुंबईतील कांजूर, विक्रोळी, भांडुप, नाहूर, पवई या भागात आता मुंबई महापालिकेला कोरोना नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे. येथील ८३.११ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. हेही वाचा -

'या' भागांमध्ये सेरो सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

मुंबईत १ लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात, ११३२ नवे रुग्णRead this story in English
संबंधित विषय
Advertisement