Advertisement

भाजपा नेते निलेश राणे यांना कोरोनाची लागण

भाजपचे नेते निलेश राणे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. निलेश राणे यांनी स्वत: ट्वीटकरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

भाजपा नेते निलेश राणे यांना कोरोनाची लागण
SHARES

कोरोनाच्या (corona news in mumbai) संसर्गानं राजकीय नेत्यांपासून ते अनेक दिग्गजांना वेढलं आहे. मोठ्या पक्षातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण (COVID 19) झाली आहे. आता माहिती समोर येत आहे की, भाजपचे नेते (BJP) निलेश राणे (Nilesh Rane) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. निलेश राणे यांनी स्वत: ट्वीटकरून यासंदर्भात माहिती दिली आहे.

सुरुवातीला प्राथमिक लक्षण दिसली. त्यामुळे निलेश राणे यांनी कोरोनाची चाचणी केली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं निलेश राणे हे सेल्फ क्वारंटाईन झाले आहेत. त्यांच्यावर पुढील उपचार सुरू असल्याचं कळत आहे.

निलेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, 'कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्यानं चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानं मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतलं आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी.'

हेही वाचा : राज्यात बदली घोटाळा, सीआयडी चौकशी करा- भाजप

राज्यात अनेक दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना नागपूरहून तातडीनं मुंबईतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं.

आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना नुकतंच आयसीयूतून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे. तुमच्या आशीर्वादामुळेच मी वाचले, अशी भावना नवनीत राणा यांनी आपल्या पाठिराख्यांना एका व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

नवनीत राणा यांना ६ ऑगस्टला कोरोना विषाणूची बाधा झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या कुटुंबियांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये आमदार रवी राणा यांचे वडील, आई, बहीण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या यांच्या सह खासदार नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलगाही करोनाबाधित निघाले आहेत.



हेही वाचा

तुमच्या आशीर्वादामुळेच मी वाचले, नवनीत राणांनी मानले आभार

भाजप आमदाराने पाठवली संजय राऊतांना नोटीस

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा