Advertisement

तुमच्या आशीर्वादामुळेच मी वाचले, नवनीत राणांनी मानले आभार

कोरोनाची लागण झालेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना नुकतंच आयसीयूतून जनरल वाॅर्डमध्ये हलवण्यात आलं आहे.

तुमच्या आशीर्वादामुळेच मी वाचले, नवनीत राणांनी मानले आभार
SHARES

कोरोनाची लागण झालेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना नुकतंच आयसीयूतून जनरल वाॅर्डमध्ये हलवण्यात आलं आहे. तुमच्या आशीर्वादामुळेच मी वाचले, अशी भावना नवनीत राणा यांनी आपल्या पाठिराख्यांना एका व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. (amravati mp navneet rana shares a video from lilavati hospital)

नवनीत राणा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वनीत राणा यांना ६ ऑगस्टला कोरोना विषाणूची बाधा झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खासदार नवनीत राणा यांची कोराेना टेस्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये आमदार रवी राणा यांचे वडील, आई, बहीण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या यांच्या सह खासदार नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलगाही करोनाबाधित निघाले आहेत. 

हेही वाचा - खासदार नवनीत राणा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय


त्यातच सुरूवातीला अमरावतीच्या स्थानिक रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नवनीत राणा यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु गुरुवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबियांनी घेतला. 

उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांना आयसीयूतून जनरल वाॅर्डमध्ये हलवण्यात आलं. त्यानंतर त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांशी संवाद साधला. आज मला आयसीयूमधून सामान्य वॉर्डमध्ये आणण्यात आलं. आता माझी प्रकृती थोडी स्थिर आहे. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांमुळेच मी वाचले आहे. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेतच. मी लवकर बरी होऊन पुन्हा जनतेच्या सेवेत रूजू होणार आहे,” असं नवनीत राणा फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडिओतून म्हणाल्या आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा