Advertisement

खासदार नवनीत राणा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नागपूरहून तातडीने मुंबईतील खासगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खासदार नवनीत राणा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय
SHARES

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नागपूरहून तातडीने मुंबईतील खासगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्यावर वांद्र्यातील लीलावती रुग्णालयात पुढील उपचार होण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांना ६ ऑगस्टला कोरोना विषाणूची बाधा झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (covid 19 positive mp navneet rana will shift to mumbai for treatment)

खासदार नवनीत राणा यांची कोराेना टेस्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये आमदार रवी राणा यांचे वडील, आई, बहीण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या यांच्या सह खासदार नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलगाही करोनाबाधित निघाले आहेत. 

त्यातच सुरूवातीला अमरावतीच्या स्थानिक रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नवनीत राणा यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु गुरुवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबियांनी घेतला. 

नवनीत राणा यांना मुंबईला आणण्यासाठी रस्तेमार्गाने १२ ते १५ तासांचा प्रवास करावा लागणार आहे.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा