Advertisement

भाजप आमदाराने पाठवली संजय राऊतांना नोटीस

लेखातून राऊत यांनी सुशांतच्या कुटुंबियांची अशा प्रकारे पुरावे नसताना जाहिर बदनामी करणे चुकीचे आहेत. ते राज्यसभेतील खासदार आहेत. संपूर्ण विषय माहितीनसताना त्यांनी यावर बोलायला नको होते

भाजप आमदाराने पाठवली संजय राऊतांना नोटीस
SHARES

सुशांतसिंह  राजपूत प्रकरणावर गेला महिनाभर राजकीय गदारोळ सुरू असताना. खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनातून सुशांतच्या कुटुंबियांची बदनामी केल्याचा आरोप अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा चुलत भाऊ आणि भाजप आमदार नीरज सिंह बबलू यांने केली आहे. राऊत यांनी ४८ तासात माफी न मागितल्यामुळे आमदार नीरज सिंह बबलू यांनी राऊत यांना लिगल नोटीस पाठवल्याचे कळते.

हेही वाचाः- डायरीतल्या ‘त्या’ पानांनी सुशांतचे रहस्य उलघडले, बाॅलीवूड ते हाॅलीवूडचा असा करणार होता प्रवास

संजय राऊत यांनी 'सामना'तील 'रोखठोक' या सदरातून सुशांतचे वडील के. के. सिंह यांच्याबद्दल काही दावे केले आहेत. राऊत यांनी लिहिल्यानुसार, सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचं कारण नव्हतं. सुशांत हा गेल्या काही वर्षांत संपूर्ण मुंबईकर बनला. त्याचा बिहारशी संबंध नव्हता. सुशांतला सर्व वैभव मुंबईनेच दिले. त्याच्या संघर्षाच्या काळात बिहार पाठीशी नव्हता. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरलं नव्हतं. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक ‘एफआयआर’ दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही.

हेही वाचाः- सुशांत सिंहचं नाव सध्या मोदींपेक्षाही चर्चेत

बिहारचे पोलीस म्हणजे ‘इंटरपोल’ नव्हे. एका गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. त्याच वेळी दुसऱ्या राज्याचा काहीच संबंध नसताना त्यांनी समांतर तपास सुरू करावा हा मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास आहे. बिहार पोलिसांकडे याबाबत काही वेगळी मते असतील तर त्यांनी मुंबई पोलिसांशी यावर चर्चा करायला हरकत नाही. सत्य समजून घेणे हा सगळ्यांचा अधिकार आहे. पण हे सत्य फक्त बिहारचेच पोलीस किंवा सीबीआय शोधू शकेल, ही भूमिका चुकीची आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.

हेही वाचाः- सुशांत आत्महत्या प्रकरणात संजय राऊत अडचणीत

सुशांतच्या मृत्यूमागे रहस्य आहे. त्या रहस्यकथेत सिनेमा, राजकारण व उद्योग क्षेत्रांतील मोठी नावे गुंतली आहेत. त्यामुळे मुंबईचे पोलीस नीट तपास करणार नाहीत, अशी तक्रार बिहार सरकारची आहे. मुंबई पोलिसांना तपास जमणार नाही. त्यामुळे तो ‘सीबीआय’कडे द्या, अशी मागणी बिहारच्या सरकारने केली व २४ तासांत ती मागणी मान्यदेखील झाली. केंद्र सरकारतर्फे ऍटर्नी जनरल तुषार मेहता सर्वोच्च न्यायालयात उभे राहतात व ‘‘सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय झाला आहे,’’ असं सांगतात.

हेही वाचाः- सुशांतच्या मनात माझ्या कुटुंबियांबद्दल ‘ही’ भावना होती- रिया चक्रवर्ती

राज्याच्या स्वायत्ततेवर हे सरळ आक्रमण आहे. सुशांत प्रकरण आणखी काही काळ मुंबई पोलिसांच्या हाती राहिलं असतं तर आभाळ कोसळलं नसतं, पण एखाद्या विषयाचे राजकीय भांडवल व दाबदबावाचे राजकारण करायचंच म्हटलं की, आपल्या देशात काहीही घडू शकेल. सुशांत प्रकरणाची ‘पटकथा’ जणू आधीच लिहिली गेली होती. पडद्यामागे बरंच काही घडले असावं, पण जे घडले त्याचे एका वाक्यात सार सांगावं तर, ‘महाराष्ट्राविरुद्धचं कारस्थान’ असंच सांगावं लागेल, असा आरोपही संजय राऊत यांनी केला होता. त्यावर लेखातून राऊत यांनी सुशांतच्या कुटुंबियांची अशा प्रकारे पुरावे नसताना जाहिर बदनामी करणे चुकीचे आहेत. ते राज्यसभेतील खासदार आहेत. संपूर्ण विषय माहितीनसताना त्यांनी यावर बोलायला नको होते, असे सुशांतच्या कुटुंबियांनी मत व्यक्त केले. जर राऊत यांनी ४८ तासात माफी मागितली नाही. तर त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे यापूर्वीत नीरज सिंह बबलू यांनी सांगितले होते. त्यावर राऊत यांनी माफी न मागितल्यामुळे आता भाजप आमदार नीरज सिंह बबलू यांनी राऊत यांना नोटीस पाठवल्याचे कळते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement