Advertisement

सुशांत सिंहचं नाव सध्या मोदींपेक्षाही चर्चेत

सध्याच्या घडीला सुशांत सिंहचं नाव देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इतकंच नाही, तर अमेरिकेच्या राष्ट्रपतींपेक्षाही चर्चेत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार माजिद मेनन यांनी केला आहे.

सुशांत सिंहचं नाव सध्या मोदींपेक्षाही चर्चेत
SHARES

प्रसार माध्यमांसोबतच बाॅलिवूडमध्ये रस असलेल्या किंवा नसलेल्या अशा प्रत्येक सर्वसामान्यांच्या तोंडी सध्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा विषय चवीने चघळला जाताना दिसत आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला सुशांत सिंहचं नाव देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इतकंच नाही, तर अमेरिकेच्या राष्ट्रपतींपेक्षाही चर्चेत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार माजिद मेनन यांनी केला आहे. (ncp rajya sabha mp majeed memon reacts on sushant singh rajput suicide case)

आपल्या ट्विटर हँडलवर सुशांतसंदर्भात मत प्रदर्शन करताना माजिद मेनन म्हणाले, सुशांत जिंवत असताना जेवढा प्रकाशझोतात नव्हता तेवढा तो त्याच्या मृत्यूनंतर आला आहे. सध्याच्या घडीला आपल्या देशाचे पंतप्रधान किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यापेक्षाही अधिक जागा त्याने माध्यमांवर व्यापलेली आहे.

कोणत्याही गुन्ह्याचा तपास सुरू असताना त्याबद्दलची माहिती गोपनीय ठेवणं आवश्यक असतं. या प्रकरणासंबंधातील प्रत्येक घडामोडी, पुराव्याबाबतची माहिती सार्वजनिक झाल्यास त्याचा सत्य आणि न्यायावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असंही माजित मेनन म्हणाले.

हेही वाचा - नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, शरद पवारांनी पार्थला फटकारलं

आपल्या ट्विटवर ट्रोलर्सकडून टीकेचा भडीमार झाल्यावर सुशांत सिंह आपल्या हयातीत प्रसिद्ध नव्हता, असा माझ्या ट्विटचा अर्थ नाही, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ लावणाऱ्यांनी ते समजून घ्या, असंही माजिद मेनन यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यास महाराष्ट्र तसंच मुंबई पोलीस सक्षम आहेत. त्यांच्यावर मला १०० टक्के विश्वास आहे. पण तरीही कुणाला सीबीआय किंवा इतर यंत्रणेने तपास करावा असं वाटत असेल तर मी त्याला विरोध करणार नाही. चौकशी कोणी करायची हा राज्य सरकार, सीबीआयचा प्रश्न आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

एका अभिनेत्याने आत्महत्या करणं नक्कीच दुर्दैवी आहे.एखाद्याने आत्महत्या केली तर त्यावर दु:ख होणं स्वाभाविक आहे. परंतु या प्रकरणाची ज्या पद्धतीने मीडियात चर्चा सुरू आहे, ते पाहून आश्चर्य वाटतं. या प्रकरणात कुणी कुणावर काय आरोप केले या खोलात मला जायचं नाही. माझ्या जिल्ह्यात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पण मीडियाने त्याची नोंदही घेत नाही, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा