Advertisement

सुशांतच्या आत्महत्येच्या चर्चा आश्चर्यजनक, शरद पवारांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

सुशांत सिंह राजपूत या अभिनेत्याने आत्महत्या करणं नक्कीच दुर्दैवी आणि परंतु त्याच्या आत्महत्येची प्रसार माध्यमांमध्ये ज्या प्रकारे चर्चा सुरू आहे, ते सर्व आश्चर्यजनक आहे, असं शरद पवार म्हणाले.

सुशांतच्या आत्महत्येच्या चर्चा आश्चर्यजनक, शरद पवारांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया
SHARES

सुशांत सिंह राजपूत या अभिनेत्याने आत्महत्या करणं नक्कीच दुर्दैवी आणि परंतु त्याच्या आत्महत्येची प्रसार माध्यमांमध्ये ज्या प्रकारे चर्चा सुरू आहे, ते सर्व आश्चर्यजनक आहे. माझ्या जिल्ह्यात मागील काही महिन्यांत २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याची साधी दखलही मीडियाने घेतलेली नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. (ncp chief sharad pawar first reaction on sushant singh rajput suicide case)

शरद पवार आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात बुधवार १२ आॅगस्ट २०२० रोजी नरिमन पाॅईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं छोटेखानी बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं.

हेही वाचा - Aaditya Thackeray: तुम्हाला व तुमच्या मुलाला राजीनामा द्यावा लागेल- निलेश राणे

यासंदर्भात शरद पवार म्हणाले की, एका अभिनेत्याने आत्महत्या करणं नक्कीच दुर्दैवी आहे.एखाद्याने आत्महत्या केली तर त्यावर दु:ख होणं स्वाभाविक आहे. परंतु या प्रकरणाची ज्या पद्धतीने मीडियात चर्चा सुरू आहे, ते पाहून आश्चर्य वाटतं. या प्रकरणात कुणी कुणावर काय आरोप केले या खोलात मला जायचं नाही. माझ्या जिल्ह्यात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पण मीडियाने त्याची नोंदही घेत नाही, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यास महाराष्ट्र तसंच मुंबई पोलीस सक्षम आहेत. त्यांच्यावर मला १०० टक्के विश्वास आहे. पण तरीही कुणाला सीबीआय किंवा इतर यंत्रणेने तपास करावा असं वाटत असेल तर मी त्याला विरोध करणार नाही. चौकशी कोणी करायची हा राज्य सरकार, सीबीआयचा प्रश्न आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा - हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंविरोधात पुरावे द्या, राऊतांचं भाजपला आव्हान


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा