Advertisement

aaditya thackeray: तुम्हाला व तुमच्या मुलाला राजीनामा द्यावा लागेल- निलेश राणे

या प्रकरणात तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरूपयोग केल्याने तुम्हाला आणि तुमच्या मुलाला राजीनामा द्यावा लागेल, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

aaditya thackeray: तुम्हाला व तुमच्या मुलाला राजीनामा द्यावा लागेल- निलेश राणे
SHARES

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे या दोघांवरही सातत्याने आरोप करणारे भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे पितापुत्रांवर निशाणा साधला साधला आहे. या प्रकरणात तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरूपयोग केल्याने तुम्हाला आणि तुमच्या मुलाला राजीनामा द्यावा लागेल, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. (aaditya and uddhav thackeray must resign from post demands bjp leader nilesh rane)

उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचं नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्ड मध्ये आले... की आदित्य ठाकरेचा सुशांत सिंग राजपूतच्या केस मध्ये सहभाग जाणवतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण ह्या केस मध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला आहे, असं त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर म्हटलं आहे.

हेही वाचा - हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंविरोधात पुरावे द्या, राऊतांचं भाजपला आव्हान

एका वृत्तवाहिनीशी बोलताना निलेश राणे म्हणाले की अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव आलेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डवर नाव येणं ही साधी गोष्ट नाही. बिहार सरकारच्या काऊन्सिलने नाव घेतलं आणि सुप्रीम कोर्टाने ते नाव काढून टाकलेलं नाही. आरोपी म्हणून यांचं नावही त्या रेकॉर्डवर गेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिलाच पाहिजे. 

मुंबईत २६/११ चा दहशतवादी हल्ला झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आपले चिरंजीव रितेश देशमुख आणि सिने दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना सोबत घेऊन ताज हाॅटेलची पाहणी करायला गेले होते. त्यावरून त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर नैतिकतेच्या आधारे विलासरावांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं नाव मर्डर मिस्ट्रीमध्ये रेकॉर्डवर आलं आहे. या प्रकरणाच्या तपासात मुख्यमंत्री आपल्या मुलाला वाचवण्यासाठी हस्तक्षेप करु शकतात. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री व आदित्य ठाकरेंनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.  

हेही वाचा - सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास अजूनही मुंबई पोलिसांकडेच- गृहमंत्री

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा