खड्डे बुजवण्याचा नवा मंत्र, महापालिका स्वत:च बनवणार कोल्ड मिक्स

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारांवर अवलंबून असणाऱ्या मुंबई महापालिकेने आता स्वत:च कोल्ड मिक्स बनवण्याचा निर्णय घेतला आहे. खड्डे बुजवण्यासाठी कोल्ड मिक्सचा वापर करण्यात येतो. मागील वाईट अनुभव लक्षात घेऊन महापालिका या महिन्याच्या सुरूवातीलाच १२०० मेट्रीक टन कोल्ड मिक्सचं उत्पादन करणार आहे.

खड्ड्यांची नोंदणी

गेल्या वर्षी महापालिकेने २५०० मेट्रीक टन कोल्ड मिक्स बनवण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. परंतु निविदा प्रक्रिया आणि कच्च्या मालाची अनुपलब्धता यामुळे महापालिकेला आपलं लक्ष्य पूर्ण करता आलं नाही. महापालिकेच्या मते, एप्रिलपर्यंत कोल्ड मिक्सचं उत्पादन बंद करण्यात येईल. महापालिकेकडून सध्या प्रत्येक वाॅर्डातील खड्डे असलेल्या रस्त्यांची यादी बनवण्यात येत आहे. जेणेकरून आवश्यकतेनुसार कोल्ड मिक्स बनवता येईल.

वाॅर्ड अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबईकरांना खड्ड्यासंदर्भातील तक्रार नोंदवण्यासाठी महापालिकेने वेबसाईट http://www.mcgm.gov.in, २४ वाॅर्ड अधिकाऱ्यांचे व्हाॅट्सअॅप नंबर आणि टोल फ्री नंबर १९१६ इ. सेवा उपलब्ध करून दिली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर ४८ तासांच्या आत हे खड्डे भरण्याची सक्ती वाॅर्ड अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. तसंच खड्ड्यांची खोली २५ मिमी किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास कोल्डमिक्सचा वापर करून खड्डे भरण्याची सूचना एक परिपत्रक काढून महापालिकेने रस्ते अभियंता यांना केली आहे.

खर्च कमी

याआधी महापालिका हे मिश्रण आॅस्ट्रेलिया आणि इस्त्राइलमधून आयात करत होती. इस्त्राइलमधून हे मिश्रण खरेदी करण्यासाठी महापालिकेला प्रति किलो १७० रुपये मोजावे लागत होते. परंतु आता प्रति किलो केवळ २८ रुपयांमध्ये महापालिका स्वत: हे मिश्रण बनवत आहे.


हेही वाचा-

खड्डयात काहीही टाका, पण एकदाचं बुजवाच

खड्ड्यांची भूक जास्त, पण कोल्डमिक्सच कमी


पुढील बातमी
इतर बातम्या