Advertisement

खड्डयात काहीही टाका, पण एकदाचं बुजवाच


खड्डयात काहीही टाका, पण एकदाचं बुजवाच
SHARES

रस्त्यांवरील खड्डयांसाठी वापरण्यात येणाऱ्या कोल्डमिक्सचं तंत्रज्ञान अयशस्वी ठरल्याचा आरोप स्थायी समिती सदस्य आणि नगरेसवकांकडून होत आहे. प्रशासनाने मात्र या सदस्यांवरच आरोप करत हॉटमिक्सच्या उत्पादक कंपनीशी सेटींग झाल्यामुळेच नगरसेवक कोल्डमिक्सविरोधात बोंबाबोंब करत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे नगरसेवक संतप्त झाले असून खड्डयात कोल्डमिक्स टाका नाही तर हॉटमिक्स, नाहीतर आणखी काही टाका. पण एकदाचे खड्डे कायमस्वरुपी बुजवा असाच सूर आळवला आहे.


नगरसेवकांवर अारोप

पश्चिम उपनगरातील परिमंडळ ३ मधील विविध रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी यापूर्वी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराचा प्रस्ताव निकृष्ट दर्जाचं काम करणारा कंत्राटदार असल्यामुळे फेटाळण्यात आला होता. त्यामुळे या परिमंडळातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी नव्याने कंत्राटदाराची नेमणूक करण्याच प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला आला असता विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हॉटमिक्सच्या उत्पादन कंपनीशी संगनमत असल्याने कोल्डमिक्सबाबत नगरसेवकांकडून आरोप केले जात असल्याचे प्रसारमाध्यमात अधिकारी सांगत सुटले असल्याची बाब निदर्शनास आणून तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे या तंत्रज्ञानाची आयआयटीमार्फत चौकशी केल्यानंतरच याचा वापर करण्याची मागणी त्यांनी केली.


तर अधिकाऱ्यांचा सत्कार कर

भाजपाचे मनोज कोटक यांनी कंत्राटदारांना हॉटमिक्स वापरण्याची मुभा दिली जाते. परंतु त्यांना कोल्डमिक्सचाही पुरवठा केला जातो. त्यामुळे कंत्राटदाराने कोल्डमिक्स आणि हॉटमिक्सचा वापर केल्यास त्यांना कोणता दर आकारला जातो, अशी विचारणा केली. मुंबईत आजही एकही खड्डा टिकला जात नाही. असा टिकलेला खड्डा दाखवा आम्ही अधिकाऱ्यांचा शिवाजी पार्कवर जाहीर सत्कार करू, असंही आव्हान कोटक यांनी दिलं.


आयुक्तांनी स्पष्टीकरण द्यावं

एक खड्डा बुजवण्यासाठीच एक टन कोल्डमिक्स वापरलं जातं.  तर मग इतर प्रभागातील रस्त्यांवरील खड्डे कसे बुजणार असा सवाल करत वरळी अस्फाल्ट प्लांटमध्ये निर्माण करण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाबद्दलच्या प्रमाणाबाबतच अभियंत्यांना कल्पना नाही. मग तंत्रज्ञान चांगल्या दर्जाचं कसं बनेल, असा सवाल सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी केला. यावर अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हे तंत्रज्ञान अयशस्वी ठरल्याचं सांगत प्रशासनाने यावर गांभिर्यानं विचार करावा नाहीतर रस्त्यांच्या प्रस्तावावर समितीला विचार करावा लागेल, असा इशारा दिला. समिती सदस्य आणि नगरसेवकांविरोधात हॉटमिक्सबाबत केलेल्या आरोपांबाबतही प्रशासनाने आणि आयुक्तांनी स्पष्टीकरण द्यावं, असेही आदेश जाधव यांनी दिले.हेही वाचा - 

सुधार समितीत शिवसेनेची नाचक्की; प्रस्ताव घाईत मंजूर केल्यामुळे विरोधकांचा सभात्याग

झाडाच्या 'त्या' तुटलेल्या फांदीला तारेचा संसर्ग
संबंधित विषय