मिठी नदी होणार पर्यटन स्थळ, महापालिका करणार २१ कोटी खर्च

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील मिठी नदीला पर्यटन स्थळ बनण्यासाठी मुंबई महापालिकेनं प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सादर करण्यात येणार आहे. मिठी नदीच्या विकासासाठी एक सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला होता. मिठी नदीला पर्यटन स्थळ करण्यासाठी महापालिका २१ कोटी रुपये खर्च करणार आहे. तसंच, मिठी नदीच्या विकासासाठी सल्लागाराच्या नियुक्तीकरीता महापालिकेनं आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा काढल्या होत्या.

विकासासाठी सल्लागार

महापालिकेनं या कामासाठी 'आयव्हीएल स्वीडिश पर्यावरण संशोधन संस्थे'ला निविदा प्रक्रियेद्वारे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. या कंपनीला सल्लागार म्हणून नियुक्त करण्यासाठी महापालिकेनं २१ कोटी रुपये खर्च करण्याची योजना बनविली आहे. िठी नदी ही सीप्झ, मरोळ, बेल बाजार, कुर्ला, वांद्रे कुर्ला संकूल  (बीकेसी), इथून वाहते आणि माहीम क्रिक इथं मिळते. तसंच, हा भाग तब्बल १७.८४ किलोमीटर इतका असून ११.८४ किलोमीटर इतका नदीचा भाग महापालिकेच्या हद्दीमध्ये येतो. उर्वरित भाग हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या(एमएमआरडीए) अंतर्गत येतो.

४ टप्प्यांमध्ये होणार विकास

मिठी नदीचा विकास ४ टप्प्यांमध्ये होणार आहे. गोरेगावमधील फिल्टर पाडा ते पवई जल विभागापर्यंत सर्व्हिस रोड बनवण्यात योणार आहे. हा सर्व्हिस रोड २ किलोमीटर इतका असणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पवई ते सीएसएमटी पूलपर्यंत सीव्हरेज लाईन मोड आणि एक सीव्हरेज उपचार केंद्र निर्माण करण्यात येणार आहे.


हेही वाचा -

बेस्टचे १ हजार ३३३ कर्मचारी कर्गरोगाचे संशयित

एसी लोकलच्या तिकीट दरांत होणार वाढ


पुढील बातमी
इतर बातम्या