Advertisement

एसी लोकलच्या तिकीट दरांत होणार वाढ

पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. एसी लोकलच्या तिकीट दरांत वाढ होणार आहे. १ जूनपासून ही दरवाढ लागू करण्यात येणाऱ्या आहे.

एसी लोकलच्या तिकीट दरांत होणार वाढ
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. एसी लोकलच्या तिकीट दरांत वाढ होणार आहे. १ जूनपासून ही दरवाढ लागू करण्यात येणाऱ्या आहे. त्यामुळं आता एसी लोकलचं एकदिशा मार्गाचं किमान तिकीट ६५ आणि कमाल तिकीट २२० रुपये असणार आहे. परंतु, शनिवार आणि रविवार एसी लोकलसेवा बंद असल्यानं प्रत्यक्षात ३ जूनपासून प्रवाशांना एसी लोकलच्या तिकिटांसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.


भाडेदर १.३च्या पटीत

पश्चिम रेल्वे मार्गावर २५ डिसेंबर २०१७ रोजी पहिली एसी लोकल धावली. परंतु, सुरूवातीच्या काळात या लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर या लोकलला प्रवाशांची पसंती मिळत गेली. त्याचप्रमाणं, भाडेदराची दरवर्षी एप्रिल महिन्यात फेररचना केली जाते. परंतु, ३१ मे २०१९ पर्यंत त्यात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ही मुदत आता संपल्यानं एसी लोकलच्या तिकीट दरांत वाढ करण्यात आली असून, .२ च्या पटीत असलेले भाडेदर १.३ च्या पटीत आकारले जाणार आहेत. त्यामुळं प्रवाशांना या दरवाढीचा सामना करावा लागणार आहे.


पासही महागला

एसी लोकलच्या चर्चगेट ते दादर स्थानकापर्यंतच्या महिन्याच्या पासासाठी आधी ८२० रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता ८८५ रुपये मोजावे लागणार आहे. तसंच, चर्चगेट ते अंधेरीचा महिन्याच्या पासासाठी आधी १.२४० रुपये मोजावे लागत होते तर, आता १,३३५ रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचप्रमाणं, चर्चगेट ते विरारपर्यंत महिन्याचा पासासाठी आधी २,०४० रुपये मोजावे लागत होते. परंतु, आता २,२०५ रुपये मोजावे लागणार आहे.


नवे पास दर

चर्चगेट ते विरारजुने दर नवे दर
सामान्य तिकीट२०५२२०
१ महिन्याचा पास,०४०,२०५
एका आठवड्याचा पास,०७० ,१५०
दोन आठवड्यांचा पास,५५५,६८०


नवे तिकीट दर 

चर्चगेट ते प्रभादेवी
६५
चर्चगेट ते दादर
९०
चर्चगेट ते अंधेरी
१३५
चर्चगेट ते बोरिवली
१८०
चर्चगेट ते भाईंदर
१९०
चर्चगेट ते विरार
२२०हेही वाचा -

नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथसंबंधित विषय
Advertisement