बेस्टचे १ हजार ३३३ कर्मचारी कर्गरोगाचे संशयित

बेस्टचे १ हजार ३३३ कर्मचारी कर्गरोगाचे संशयित असल्याची माहिती समोर येत आहे. मागील ३ वर्षांत बेस्ट उपक्रमातील तंबाखू सेवन करणाऱ्या ३ हजार ३३३ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली.

SHARE

बेस्टचे १ हजार ३३३ कर्मचारी कर्गरोगाचे संशयित असल्याची माहिती समोर येत आहे. मागील ३ वर्षांत बेस्ट उपक्रमातील तंबाखू सेवन करणाऱ्या ३ हजार ३३३ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये हे कर्मचारी कर्गरोगाचे संशयित असल्याचं आढळलं आहे. त्याचप्रमाणं, बेस्टच्या एका कर्मचाऱ्याला तंबाखू सेवन केल्यामुळं तोडाचा कर्करोग झाला आहे. बेस्ट तर्फे गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमरास वडाळा आगारातील तांत्रिक प्रशिक्षण केंद्रात जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला. यावेळी बेस्टनं तंबाखूमुक्त अभियानाचा कार्यअहवाल सादर केला. त्या अहवालात तंबाखूचा वापर करणाऱ्या कर्मचारी आणि कर्करोगाचे संशयित रुग्ण यांची माहिती देण्यात आली.


मौखिक कर्करोग

बेस्टमधील १२ हजार २८९ जणांची २०१६ ते २०१७ पासून टाटा कर्करोग रुग्णालय आणि इंडियन कॅन्सर सोसायटीनं तपासणी केली आहे. या तपासणीमध्ये ३ हजार ३३३ कर्मचारी तंबाखूचा वापर करत असल्याचे निदर्शनास आलं आहे. तसंच, यामधील १ हजार ३३३ जण मौखिक कर्करोगाचे संशयित रुग्ण आढळले असून, ९९३ जणांची बायोप्सी करण्यात आली आहे. त्याशिवाय आणखी ३४० जणांची बायोप्सी करणं बाकी असल्याची माहिती देण्यात आली.


तंबाखू मुक्त कर्मचारी

बेस्ट उपक्रमातील आतापर्यंत ५ हजार कर्मचाऱ्यांची तंबाखू सेवन सोडलं असल्याची माहिती बेस्टनं दिला. दरम्यान, वडाळा आगारात झालेल्या तंबाखू विरोधी अभियानाला बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर, सदस्य सुनील गणाचार्य आणि इंडियन कॅन्सर सोसायटीचे सहयोगी संचालक डॉ. अर्जुन शिंदे उपस्थित होते.



हेही वाचा -

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळं मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू

बेस्टच्या प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावरच



संबंधित विषय
ताज्या बातम्या