Advertisement

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळं मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू

मध्य रेल्वे मार्गावरील दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान जलद मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळं मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू
SHARES

मध्य रेल्वे मार्गावरील दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान जलद मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळं लोकल गाड्या २० ते २५ मिनीटं उशिरानं धावत आहेत. शुक्रवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी बिघाड झाल्यामुळं प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे.  


लोकल रांगेत उभ्या

या सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळं मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल गाड्या मुंब्रा बोगद्याआधी ४ ते ५ लोकल २० मिनिटांपासून उभ्या आहेत. या लोकल गर्दीनं भरलेल्या असल्याचं समजतं आहे. 


दुरुस्तीचं काम हाती

मध्य रेल्वे प्रशासनाची या बिघाडची दखल घेतली असून दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. तसंच, सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्यासाठी अर्धा तास लागणार असल्याची माहिती मिळते. 



हेही वाचा -

एसी लोकलच्या तिकीट दरांत होणार वाढ

बेस्टच्या प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावरच



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा