Advertisement

बेस्टच्या प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावरच

वायुगळतीमुळेच बेस्ट उपक्रमातील सीएनजी बसनं गोरेगाव येथे पेट घेतल्याचं बेस्टच्या अंतिम अहवालात स्पष्ट झालं आहे.

बेस्टच्या प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावरच
SHARES

मुंबईतील गोरेगाव पुर्वेच्या दिंडोशी येथे एका धावत्या बसला आग लागली होती. गोरेगाव स्टेशनवरून नागरी निवारा परिषद येथे जात असणाऱ्या ३४४ नंबरच्या बसनं गोकुळधाम परिसरात अचानक पेट घेतला होता. मात्र, अद्याप या आगीच कारण स्पष्ट होत नव्हतं. परंतु, वायुगळतीमुळेच बेस्ट उपक्रमातील सीएनजी बसनं गोरेगाव येथे पेट घेतल्याचं बेस्टच्या अंतिम अहवालात स्पष्ट झालं आहे. त्यामुळं बेस्टच्या ताफ्यातील सीएनजी बसगाड्यांमधील वायुगळतीबाबत चेतावणी देणारी यंत्रणा बेस्ट उपक्रमाकडं नसल्यामुळं या बसगाड्यांची सुरक्षा वाऱ्यावरच आहे.


अचानक घेतला पेट

गोरेगाव पूर्व इथं चालत्या सीएनजी बसनं ३ मे रोजी पेट घेतला होता. सुदैवानं या दुर्घटनेत प्रवासी, वाहक आणि चालक बचावले. त्यानंतर या दुर्घटनेची चौकशी करण्यता आली. त्यावेळी या चौकशीत सीएनजी गॅसगळती झाल्यास त्याचं संकेत देणारी व्यवस्था बसमध्ये नसल्याचं समोर आलं आहे. बेस्टच्या बसगाड्यांमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असून, प्रवाशांसाठी ही बाब धोकादायक ठरणारी आहे.


जिलेबीवाल्यामुळं आग

हा अपघात सीएनजीचे प्रेशर गेजमध्ये ब्लास्ट होऊन बसच्या खाली प्रचंड जमलेला गॅस रस्त्यावरील जिलेबीवाल्यामुळं, बसच्या हॉट सायलेन्सर मफलरमधील ज्वालेनं, सिगारेट किंवा प्रवाशांच्या मोबाईलमधून ठिणगी उडाल्यानं पेटला असावा असे तपासणी अहवालात उघडकीस आलं आहे.



हेही वाचा -

एसी लोकलच्या तिकीट दरांत होणार वाढ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा