उच्च न्यायालय: मृत्यूपत्राच्या माध्यमातून भाडेकरार होऊ शकत नाही

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सार्वजनिक परिसर कायद्याअंतर्गत मृत्यूपत्राच्या माध्यमातून भाडेपट्टा देऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई (mumbai) उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे.

चर्चगेट (churchgate) येथील 2000 चौरस फुट फ्लॅट आणि गॅरेजमधून एका महिलेला बेदखल करण्याचा इस्टेट ऑफिसरचा 2008 मधील आदेश उच्च न्यायालयाने (bombay high court) कायम ठेवताना न्यायालयाने मृत्यूपत्राबाबत निरीक्षण नोंदवले.

दिवाणी न्यायालयाने 2009 मध्ये महिलेला इस्टेट ऑफीसरचा परिसर रिकामा करण्याच्या निर्देशाविरुद्ध अपील करण्यास परवानगी दिली होती. तो आदेश न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या एकलपीठाने रद्द केला.

तसेच मृत्यूपत्राद्वारे केलेले हस्तांतरण शेवटची नोंद असलेल्या भाडेकरूच्या नावे भाडेकरार हस्तांतरित करण्याच्या अटीचे उल्लंघन करणारे होते. त्यामुळे ते वैध नव्हते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

हे प्रकरण एलआयसीच्या (LIC) मालकीच्या ओव्हल मैदानाजवळील क्वीन्स कोर्ट इमारतीतील फ्लॅट आणि गॅरेजशी संबंधित आहे. सुरुवातीला मूळ भाडेकरूच्या नावावर भाडेपट्टा होता.

तसेच त्या भाडेकरूच्या मृत्यूनंतर 1986 मध्ये एलआयसीने महिलेच्या पतीला भाडेपट्टा हस्तांतरित केला. तसेच सप्टेंबर 1994 मध्ये त्यांचे निधन झाले.

त्यांनी एक मृत्यूपत्र लिहिले होते. ज्याअंतर्गत त्यांनी कथितपणे त्यांच्या पुतणीला जागा दिली होती. ती त्यांच्यासोबत राहत होती, असा दावा न्यायालयात करण्यात आला.

ती 1997 पर्यंत संबंधित जागेवर भाडे देत राहिली. जानेवारी 1997 मध्ये एलआयसीने मृत भाडेकरूच्या कायदेशीर वारसांना घर रिकामे करण्याची सूचना जारी केली.

1997 मध्ये कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर 2008 मध्ये इस्टेट ऑफीसरने निर्णय दिला. ती पुतणी अनधिकृतपणे जागेवर राहत होती.

तसेच तिला एलआयसीने कधीही भाडेकरू म्हणून मान्यता दिली नाही, असा निष्कर्ष इस्टेट ऑफीसरने काढला होता. महिलेने त्या आदेशाला दिवाणी न्यायालयात आव्हान दिले होते. दिवाणी न्यायालयाने 2009 मध्ये इस्टेट ऑफीसरचा आदेश रद्द केला.

यामुळे एलआयसीला उच्च न्यायालयात पुनर्विचार अर्ज करावा लागला. त्यावर न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या एकलपीठाने निर्णय दिला.


हेही वाचा

'खान'ला मुंबईचा महापौर होऊ देणार नाही: अमित साटम

मालवणी अंबोजवाडी परिसरातील अतिक्रमण हटवले

पुढील बातमी
इतर बातम्या