राणीच्या बागेत होणार वाघाचं दर्शन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पर्यटकांसह अनेक मुंबईकर मोठ्या प्रमाणात भायखळा (Byculla) येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात (Rani Baug) गर्दी करतात. राणी बागेतील पेंग्वीन (Penguins) हे पर्यटकांसह मुंबईकरांचे आकर्षणस्थान बनलं आहे. या पेंग्विन्सप्रमाणं आता वाघांच्या जोडीचं दर्शनही होणार आहे. सिंहाचं आगमन लांबल्यानं प्रशासनानं काळे पट्टे असलेल्या वाघांची जोडी आणण्याची तयारी केली आहे. 

राज्य सरकारच्या वाईल्ड लाइन वॉर्डनकडून (Wild line warden) हिरवा कंदील मिळताच औरंगाबाद (Aurangabad) येथून वाघाची जोडी आणण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. गुजरातमधील (Gujrat) जुनागड येथील प्राणिसंग्रहालयातील सिंहाची जोडी राणीच्या बागेत आणण्यास केंद्रीय प्राणिसंग्रहालय नियामक मंडळाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. मात्र, सिंहाच्या (Lion) बदल्यामध्ये जुनागड प्राणिसंग्रहालयाला २ जोड्या झेब्रा (Zebra) द्यावा लागणार आहे.

झेब्रा खरेदीसाठी प्रशासनानं २ वेळा निविदा (Tender) काढल्या होत्या. मात्र, या निविदांना प्रतिसाद न मिळाल्या नाहीत. त्यामुळं झेब्रा खरेदीसाठी आता तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसंच, राणीच्या बागेत वाघाची जोडी (Tiger) आणण्याची तयारी सुरू केली आहे. औरंगाबाद येथील महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील वाघांची जोडी राणीच्या बागेत आणण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. वाघाच्या जोडीच्या बदल्यात औरंगाबादमधील प्राणिसंग्रहालयानं चितळ्याच्या २ जोड्या आणि टेंडर स्टॉर्क नामक पक्ष्याच्या दोन जोड्यांची मागणी केली आहे.

सध्या राणीच्या बागेत चितळ आणि टेंडर स्टॉर्क पक्षी उपलब्ध आहेत. त्यामुळं चितळ आणि टेंडर स्टॉर्क पक्षी देऊन राणीच्या बागेत वाघाची जोडी आणण्यात येणार आहे. उभय प्राणिसंग्रहालयांतील वन्य प्राणी आणि पक्ष्यांच्या देवाण-घेवाणीला राज्य सरकारच्या वाईल्ड लाइफ वॉर्डनच्या परवानगीची आवश्यकता आहे. ही परवानगी मिळावी यासाठी राणीच्या बागेतील प्रशासनाकडून लवकरच वाईल्ड लाइफ वॉर्डनला पत्र पाठविण्यात येणार आहे. आवश्यक ती परवानगी मिळाल्यानंतर तात्काळ औरंगाबाद येथून वाघाची जोडी आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. वाघांची जोडी राणीच्या बागेत दाखल झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्यांना स्वतंत्र ठेवण्यात येणार असल्याचं समजतं.


हेही वाचा -

कारशेड आरेतच व्हावं, समितीच्या शिफारशीने मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढणार

‘भारत बंद’ला सरकारचाच पाठिंबा, मनसेचा गंभीर आरोप


पुढील बातमी
इतर बातम्या