मुंबईत केबल सेवा बंद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणा (ट्राय) च्या नव्या धोरणाविरोधात केबल आॅपरेटर्स अँण्ड ब्राॅडकास्ट असोसिएशननं गुरूवारी २७ डिसेंबर रोजी संध्याकाळी सात वाजल्यापासूनच केबला सेवा बंद केली होती. मुंबईत दादर, प्रभादेवी, वांद्रे, परळ यांसह विविध ठिकाणी केबल सेवा बंद ठेवण्यात आली असून संध्याकाळच्या दरम्यान सुरू असणारे घराघरातील टिव्ही बंद ठेवण्यात आले आहेत. 

वाहिन्या निवडण्याचा अधिकार 

२९ डिसेंबरपासून देशभरातील केबल, टीव्ही, डीटीएच ग्राहकांना वाहिन्या निवडण्याचा अधिकार देण्यात आलं आहे. त्यानुसार ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार वाहिन्या निवडता येणार असून त्यासाठी ग्राहकांना निश्चित दर मोजावे लागणार आहेत. मात्र या निर्णयाचा मोठा फटका देशभरातील केबल चालकांना बसणार असल्याचं म्हणत केबल चालकांनी केबल असोसिएशनने या निर्णयाला जोरदार विरोध केला आहे. या विरोधासाठी  केबल असोसिएशनने बुधवारी बैठकीद्वारे गुरूवारी प्राईम टाईमला तीन तास केबल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता

प्राईम टाईमला ब्लॅक आऊ

या निर्णयानुसार मुंबईत वरळी, दादर, परळ, मांटुगा, माहीम या सर्व ठिकाणच्या केबल चालकांनी सेवा बंद ठेवली आहे. संध्याकाळी सातच्या दरम्यान मुंबईतील गृहिणी विविध डेली सोप बघतात. परंतु ऐन प्राईम टाईमला ब्लॅक आऊटचा निर्णय घेण्यात आल्यानं गुरूवारी अनेक ठिकाणी गृहिणींना वेळ कसा घालवावा याबाबत प्रश्न पडला होता. 

मुंबईतील अनेक ठिकाणी केबल सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली असून याला १०० टक्के पाठिंबा मिळाला आहे. संध्याकाळी सात वाजल्यापासूनच केबल सेवा बंद करण्यात आली आहे.  नव्या धोरणाच्या निषेधार्थ शुक्रवारी स्टार इंडियाच्या परळच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. 

- अॅड. अनिल परब, अध्यक्ष, केबल आॅपरेटर्स अँण्ड ब्राॅडकास्ट असोसिएशननं


हेही वाचा - 

स्टेथोस्कोपच्या जागी हातात फळ आणि वजनकाटा

ठाणे मेट्रो आता गायमुखपर्यंत; कासारवडवली ते गायमुख मेट्रो-४ अ ला हिरवा कंदील


पुढील बातमी
इतर बातम्या