Advertisement

स्टेथोस्कोपच्या जागी हातात फळ आणि वजनकाटा

नागपूर, अंबेजोगाई आणि औरंगाबादमधील निवासी डाॅक्टरांना स्टायपेंड न मिळाल्यानं मार्डच्या माध्यमातून निवासी डाॅक्टरांनी गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबईसह राज्यभर आंदोलन सुरू केलं आहे. कुठं काळ्या फिती लावून सरकारचा निषेध करत निवासी डाॅक्टर काम करत आहेत. तर कुठं थेट फळविक्री करत आंदोलन केलं जातं आहे.

स्टेथोस्कोपच्या जागी हातात फळ आणि वजनकाटा
SHARES

डाॅक्टरकी हा व्यवसाय न मानता रूग्णसेवा मानत दररोज हातात स्टेथोस्कोप, इंजेक्शन, औषध-गोळ्या घेत मुंबईतील केईएम, जेजे, नायर अशा रूग्णालयातील निवासी डाॅक्टर रूग्णसेवा करत असतात. पण गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबईसह राज्यभरातील निवासी डाॅक्टरांनी स्टेथोस्कोप-इंजेक्शन, औषध-गोळ्यांएेवजी हातात चक्क फळं आणि वजनकाटा घेतला आहे. ही वेळ निवासी डाॅक्टरांवर आली आहे ती गेल्या दोन महिन्यांपासून नागपूर, अंबेजोगाई आणि औरंगाबादमधील १००० निवासी डाॅक्टरांना विद्यावेतन अर्थात स्टायपेंड न मिळाल्याने.


राज्यभर आंदोलन

नागपूर, अंबेजोगाई आणि औरंगाबादमधील निवासी डाॅक्टरांना स्टायपेंड न मिळाल्यानं मार्डच्या माध्यमातून निवासी डाॅक्टरांनी गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबईसह राज्यभर आंदोलन सुरू केलं आहे. कुठं काळ्या फिती लावून सरकारचा निषेध करत निवासी डाॅक्टर काम करत आहेत. तर कुठं थेट फळविक्री करत आंदोलन केलं जातं आहे. स्टायपेंड मिळाला नाही तर डाॅक्टरांवर फळ विकण्याची वा अशाच काही तरी गोष्टी करण्याची वेळ येईल असं म्हणत निवासी डाॅक्टरांकडून फळविक्रीचं आगळंवेगळं आंदोलन केलं जात आहे.


सायन रुग्णालयात अांदोलन

याआधी नागपूरमध्ये निवासी डाॅक्टरांनी फळ विक्री आंदोलन केलं. त्यानंतर मुंबईतील सायनच्या टिळक रूग्णालयातील निवासी डाॅक्टरांनी मंगळवारी रूग्णालयाबाहेर फळ विकत आपली कैफीयत मांडली. आता त्यापाठोपाठ गुरूवारी दुपारी केईएम रूग्णालयातील निवासी डाॅक्टरांनी रूग्णालयाबाहेर फळ विकत आपल्या मागण्यांकडे सरकारचं आणि जनतेचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.


राज्यातील चार मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरांना स्टायपेंड न मिळण्याच्या निषेधार्थ सायन, नायर यांसह विविध रुग्णालयात आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान गुरुवारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्यासोबत डॉक्टरांच्या मागणीबाबत चर्चा होणार असून डॉक्टरांच्या मागणीवर तोडगा निघाला नाही तर अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल

- आलोक सिंह, केईएम, मार्ड अध्यक्ष



हेही वाचा - 

सायन रुग्णालयात फळ विक्री करून डाॅक्टरांचं आंदोलन

विद्यावेतनासाठी नायर रुग्णालयात निवासी डॉक्टरांचं आंदोलन




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा