Advertisement

विद्यावेतनासाठी नायर रुग्णालयात निवासी डॉक्टरांचं आंदोलन


विद्यावेतनासाठी नायर रुग्णालयात निवासी डॉक्टरांचं आंदोलन
SHARES

 वेळेवर विद्यावेतन (स्टायपेंड) न मिळाल्यानं राज्यातील निवासी डॉक्टर आंदोलन करत आहेत. या आंदोलनात बुधवारी मुंबईतील नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरही सहभागी झाले असून त्यांनी हाताला काळी पट्टी बांधत सरकारचा धोरणाचा निषेध केला. त्याशिवाय सोमवारपासून नागपूर अंबेजोगाई आणि औरंगाबाद यांसह विविध वैद्यकीय कॉलेजमधील निवासी डॉक्टरांनी फळ विक्री आंदोलन सुरू केलं असून सायन रूग्णालयातील डॉक्टरांनीही रूग्णालयाबाहेर फळ विक्री आंदोलन सुरू केलं आहे.


नेमकं प्रकरण काय?

नागपूर, अंबेजोगाई आणि औरंगाबादसह इतर वैद्यकीय कॉलेजमधील जवळपास १००० निवासी डॉक्टरांना गेल्या दोन महिन्यांपासून स्टायपेंड मिळालेला नाही. त्यामुळं त्यांनी फळ विक्री आंदोलन सुरू केलं आहे. सायन रूग्णालयातील डॉक्टरांनीही फळविक्री आंदोलन सुरू केलं आहे.  या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर विद्यावेतन वेळेत न मिळाल्याच्या निषेधार्थ नायर रूग्णालयातील १०० पेक्षा जास्त डॉक्टर हाताला काळ्या रिबीन बांधून या आंदोलनात सहभागी झाले आहे. 


या आहेत मागण्या

गेल्या काही वर्षांपासून सरकारी निवासी डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाईकांकडून हल्ले वाढत अाहेत.  अशाप्रकारे झालेल्या हल्ल्यात डॉक्टरांसाठी कोणत्याही प्रकारची अलार्म सिस्टिम किंवा सिक्युरिटी ऑडीट नाही. त्यामुळ अशा प्रकारच्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात. त्याशिवाय निवासी डॉक्टरांना राहण्यासाठी सुविधा नाहीत. त्यांना २४ तासांपेक्षा जास्त वेळ काम करावं लागतं. अशा वेळी किमान त्यांना गरजेच्या काही वस्तू उपलब्ध करून द्याव्यात. तसेच डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना बॉन्ड अलॉटमेंट (बंदपत्रित)  सेवा अजूनही ऑफलाईन असल्यानं त्यांना डॉक्टरांची गरज असल्या ठिकाणी सेवा पुरवता येत नाही. त्यामुळे ते ऑनलाईन उपलब्ध करावेत. यांसह इतर मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी हे फळ विक्री आंदोलन सुरू केलं आहे. 



हेही वाचा - 

सायन रुग्णालयात फळ विक्री करून डाॅक्टरांचं आंदोलन

जे.जे.रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा शुक्रवारी रास्ता रोको




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा