न्यायालयात गैरहजर राहण्यासाठी चोक्सीची याचिका

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

देशाला कोट्यवधींचा चुना लावून पळालेल्या मेहुल चोक्सीवर प्रशासनाने फास आवळला आहे. त्यामुळंच त्यानं आता मुंबईतीस 'पीएमएलए' न्यायालयात एक याचिका दाखल करून न्यायालयात गैरहजर राहण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागितली आहे. तब्येतीचं कारण पुढे करत चोक्सीने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

आजाराचं कारण

या याचिकेत चोक्सीनं आपण गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याचं म्हटलं आहे. आपल्याला हार्टचा त्रास होत असून मेंदूतही रक्ताच्या गाठी झाल्याचंही त्यानं दाखल केलेल्या याचिकेत नमूद केलं आहे. 

तसंच यापूर्वी मेहुल चोक्सीने ब्रिटनमध्ये नवी कंपनी उभारण्यासाठी अर्ज केल्याचं काँग्रेसनं म्हटलं हे. चोक्सीला भारतात आणण्याबाबत सरकार किती गंभीर आहे, असा सवालही काँग्रेसच्यावतीनं करण्यात आला होता.


हेही वाचा -

जीवघेणा स्टंट बेतला जीवावर, दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

‘अलिबागवरून आलायस का?’ म्हणण्यावर बंदी घाला; हायकोर्टात याचिका


पुढील बातमी
इतर बातम्या