जीवघेणा स्टंट बेतला जीवावर, दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

एक स्टंट दहावीतल्या तरुणाच्या जीवावर बेतला आहे. धावत्या लोकलच्या दरवाज्यात उभे राहून स्टंट करताना मोहमद जुबेर या तरुणाला सिग्नल यंत्रणेच्या पोलची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

जीवघेणा स्टंट बेतला जीवावर, दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
SHARES

शहरात हल्ली यू ट्युबवर लाईक्स आणि टिकटॉकवर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात अनेकजण आपला जीव धोक्यात घालून स्टंट करत असतात. असाच एक स्टंट दहावीतल्या तरुणाच्या जीवावर बेतला आहे. धावत्या लोकलच्या दरवाज्यात उभे राहून स्टंट करताना मोहमद जुबेर या तरुणाला सिग्नल यंत्रणेच्या पोलची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

 

लोकलच्या दरवाजात स्टंट

वडाळा पूर्वे, बरकत अली नाका इथं राहणारा हा तरुण सीएसएमटी येथील अंजूमन इस्लाम शाळेत शिकत होता. शाळेतून घरी जाण्यासाठी मोहमदने मशिद स्थानकातून लोकल पकडली. लोकल सुरू होताच मोहमद आणि त्याच्या मित्र यांच्यासमवेत लोकलच्या दरवाज्यात उभं राहून स्टंट करण्यास सुरुवात केली. लोकल रिकामी असल्यामुळे काही प्रवाशांनी मोहमदला आत बसण्याचा सल्ला दिला. मात्र स्टंट करण्याच्या नादात असलेल्या मोहमदने त्याकडे दुर्लक्ष केलं.


खांबाला आदळून मृत्यू

सॅण्डहर्स्ट रोड ते डॉकयार्ड रोड स्थानकादरम्यान लोकलने वेग घेताच मोहमदने दरवाज्याच्या खांबाला पकडून स्टंट करण्यास सुरुवात केली. याचवेळी रुळांशेजीर उभ्या असलेल्या खांबावर मोहमद आदळला. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वडाळा रेल्वे पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.हेही वाचा -

५ वर्षानंतर लागला हत्येचा छडा

लोकसभेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर; मुंबईतून शेवाळे, किर्तीकर आणि अरविंद सावंतसंबंधित विषय