५ वर्षानंतर लागला हत्येचा छडा

मुंबईच्या चेंबूर परिसरात अपघातात झालेला मृत्यूचे गूढ उकलत हा अपघात नसून हत्या असल्याचा प्रकार तब्बल पाच वर्षानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणला.

५ वर्षानंतर लागला हत्येचा छडा
SHARES

मुंबईच्या चेंबूर परिसरात अपघातात झालेला मृत्यूचे गूढ उकलत हा अपघात नसून हत्या असल्याचा प्रकार तब्बल पाच वर्षानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणला. हत्या करण्यासाठी ठरलेली सुपारीची रक्कम न मिळाल्यामुळे नशेेेत आरोपी बरळल्याने हा गुन्हा उघडकीस आला. त्यामुळे उत्तर प्रदेशातील गावच्या सरपंचानेच त्याच्या व्यावसायिक भागिदाराची हत्या घडवून आणल्याचे उघड झाले. 


धडकेत मृत्यू

२०१४ मध्ये वडाळा टीटी पोलिसांच्या हद्दीतील चेंबूर येथील वडाळा लिंक रोड परिसरात सायकलवरून जाणा-या इकबाल बरकर खान (४०) याला अनोळखी वाहनाने धडक दिली होती. त्याप्रकरणी अनोळखी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रथमदर्शी हा गुन्हा अपघाती असल्याचेे दिसून येत होते. तसेच आरोपीची कोणतीही ओळख पटत नसल्यामुळेे पोलिसांनी कालांतराने या प्रकरणी 'अ वर्गीकरण' केले होते. पण  टॅँकर चालक अमोल तात्यासो पटोबा (३६) याला या सुपारीचे ठरलेले ३० हजार मिळाले नसल्यामुळे दारूच्या नशेत त्याने या हत्येचे सर्व पैलू उलगडले. ती माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ३ च्या पोलिसांपर्यंत पोहोचल्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले.


तिसरा आरोपी फरार

 चौकशीत  त्याचा मालक सैफुद्दीने कुरेशी (४५) याचाही हत्येतील सहभाग निष्पन्न झाला. त्यामुळे त्यालाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. त्यावेळी त्याने खान याचा व्यावसायिक भागिदार याने खानला मारण्यासाठी ४० हजार रुपयांची सुपारी दिल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांचा तपास उत्तर प्रदेशातील एका गावचा सरपंच व खानचा व्यावसायिक भागिदारापर्यंत पोहोचला. खानमुळे त्याचा यापूर्वी निवडणूकीत पराभव झाला होता. तसेच खानला त्याला १० लाख रुपये देणे बाकी होते. त्यामुळे त्याने खानचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता. याप्रकरणी कुरेशी व टँकर चालक अमोल यांना अटक केली असून तिसऱ्या आरोपीला अटक करण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेशाला रवाना झाले आहेत. 



हेही वाचा - 

सुनिल तटकरे यांना जीवे मारण्याची धमकी

धुलिवंदनाच्या दिवशी मुंबईत २ ठिकाणी हत्या




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा