सुनिल तटकरे यांना जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुनिल तटकरे यांना एका अज्ञातानं जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

सुनिल तटकरे यांना जीवे मारण्याची धमकी
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुनिल तटकरे यांना एका अज्ञातानं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यांच्या रायगड येथील म्हसळा इथं असलेल्या पक्ष कार्यालयात त्यांना एक धमकीचं पत्र आलं आहे.


पूर्ववैमनस्यातून धमकी ?

त्यांना ही धमकी पूर्ववैमनस्यातून देण्यात आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या धमकीच्या पत्रानंतर राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष नाझीम हासवारे यांनी याविरोधात म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बाळासाहेब भाऊसाहेब सातपुते या व्यक्तीची मदत घेऊन तटकरे यांना मारण्याचा कट रचला जात असल्याचं या अज्ञातानं या पत्रात नमूद केलं आहे. या पत्रानंतर कार्यकर्त्यांमध्येही संतापाचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी सदर व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्या कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. हेही वाचा -

धुलिवंदनाच्या दिवशी ७७५ तळीरामांवर कारवाई

धुलिवंदनाच्या दिवशी मुंबईत २ ठिकाणी हत्या
संबंधित विषय