धुलिवंदनाच्या दिवशी मुंबईत २ ठिकाणी हत्या

मुंबई गुरूवारी अनेक जण रंगपंचमीचा आनंद घेत असताना. चेंबूरमध्ये मालमत्तेसाठी मुलानेच वडिलांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. तर दुसरीकडे चोरीच्या उद्देशाने घरात घुसून अनोळखी चोरट्याने वृद्धेची हत्या केल्याची धक्कादायक घटना धारावी परिसरात उघडकीस आली आहे.

SHARE

गुरूवारी अनेक जण रंगपंचमीचा आनंद घेत असताना चेंबूरमध्ये मालमत्तेसाठी मुलानंच वडिलांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. तर दुसरीकडे चोरीच्या उद्देशाने घरात घुसून अनोळखी चोरट्याने वृद्धेची हत्या केल्याची धक्कादायक घटना धारावी परिसरात घडली. वृद्धेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अकबर अमीर बादशहा शेख (३५, धारावी), समीरा उर्फ शानू अकबर शेख (३४, धारावी), मोहम्मद हसन जावेद अली पठारी (२५, माहीम), मोहम्मद अैनुल हक (२९, माहीम) या चार जणांना अटक केली आहे. 


मालमत्तेचा वाद

चेंबूरच्या वाशीनाका परिसरात मृत रेहमतुल्ला सय्यद (६०)हे त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत रहात होते. रेहमतुल्ला यांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. रेहमतुल्ला यांचा त्याच्या पहिल्या पत्नीचा मुलगा मोहम्मद रेहमत्तुल्ला कादर याच्यासोबत वाद सुरू होता. गुरूवारी ते हे वाशीनाका परिसरात असताना मोहम्मद रेहमत्तुल्ला कादर त्या ठिकाणी पोहोचला. दोघांमध्ये मालमत्तेतून शाब्दीक वाद झाला. त्यावेळी राग अनावर झालेल्या मोहम्मद रेहमत्तुल्ला कादरनं अचानकच वडिलांना मारहाण करण्यास सुरूवात केली.

एवढ्यावरच न थांबता मोहम्मद रेहमत्तुल्ला कादरने वडिलांची गळा आवळून हत्या केली. या घटनेची माहिती आरपीएफ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मोहम्मद रेहमत्तुल्ला कादरला अटक केली.


धारावीतही हत्या

तर, धारावीच्या शाहूनगर परिसरात मिलिंदनगरामध्ये वसंता लक्ष्मी नारायण (७९) या राहतात. गुरूवारी वसंता या घरात एकट्या असताना. एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरात आला. दुपारची वेळ असल्यामुळे शेजारच्यांचेही दरवाजे बंद होते. वसंता एकट्या असल्याचं पाहून त्यानं घरात प्रवेश करत वसंता यांची गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर आरोपीनं वसंता यांच्या अंगावरील मौल्यवान दागिने आणि पैसे चोरून पळ काढला. या हत्येप्रकरणी शाहू नगर पोलिसात हत्येचा गुन्हा नोंदवला असून आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेत आहेत.
हेही वाचा -

वांद्रे पूर्व येथील स्कायवॉक राहणार तीन महिने बंद

कळंब समुद्रावर गेलेल्या ५ जणांचा बुडून मृत्यूसंबंधित विषय
ताज्या बातम्या