Advertisement

कळंब समुद्रावर गेलेल्या ५ जणांचा बुडून मृत्यू

धुलिवंदनाच्या दिवशी विरारमधील अर्नाळा येथील कळंब बीच येथे गेलेल्या ५ जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली.

कळंब समुद्रावर गेलेल्या ५ जणांचा बुडून मृत्यू
SHARES

धुलिवंदनाच्या दिवशी नालासोपाऱ्यातील कळंब समुद्रकिनाऱ्यावर गेलेल्या ५ जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. शोधकार्यादरम्यान त्यांना पाच जणांपैकी एकाचा मृतदेह सापडला. त्यानंतर, रात्रभर सुरू असलेल्या शोधकार्यानंतर अन्य चार जणांचेही मृतदेह सापडले आहेत. 


एकाच इमारतीमधील रहिवाशी

निशा कमलेश मौर्य (३६), प्रशांत कमलेश मौर्य (१७), प्रिया कमलेश मौर्य (१९), कांचन मुकेश गुप्ता (३५), शितल दिनेश गुप्ता (३२) अशी या मृत व्यक्तींची नावे आहेत. हे सर्व वसई पश्चिम येथील अंबाडी मानव मंदिर कॉम्प्लेक्समध्ये राहणारे होते.

मिळालेल्या माहितीनुसार, एका इमारतीमध्ये राहणारे ५ जण नालासोपाऱ्यातील कळंब समुद्रावर धुलिवंधन असल्यामुळे पोहण्यासाठी गेले होते. मात्र, समुद्रातील पाणी वाढल्यामुळे हे पाचही जण बुडाले. बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये ४ महिला तर, एका पुरुषाचा समावेश होता. या घटनेतंर भारतीय तटरक्षक दलाला याबाबत माहिती देण्यात आली. ऐन सणाच्या दिवशी ही दुर्घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.



हेही वाचा -

'तुमचा पाळणा कधी हलणार'?, राष्ट्रवादीचा भाजपाला सवाल

भाजपाची पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातून १६, तर मुंबईतील २ उमेदवारांचा समावेश



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा