'तुमचा पाळणा कधी हलणार'?, राष्ट्रवादीचा भाजपाला सवाल

मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने भाजपाविरोधात पोस्टरबाजी सुरु केली आहे. 'ज्यांना आम्ही नाकारले, हाकलले त्यांनाच तुम्ही स्वीकारले,गोंजारले, आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार?, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे.

SHARE

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपूत्र रणजितसिंह मोहिते पाटील, काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने भाजपाविरोधात पोस्टरबाजी सुरु केली आहे. 'ज्यांना आम्ही नाकारले, हाकलले त्यांनाच तुम्ही स्वीकारले, गोंजारले, आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार?, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. 

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होताच राज्यासह देशातील विविध पक्षांमधील नेते भाजपात प्रवेश करत आहेत. सुरुवातीला राधाकृष्ण विखे पाटील यांचे पूत्र सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगरची जागा सोडण्यास नकार दिल्याने सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्याचं म्हटलं. त्यानंतर, पश्चिम महाराष्ट्रातील रणजितसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला. 


राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पोस्टरबाजी

सुजय विखे यांना अहमदनगर लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तर, रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपाकडून माढा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, यांच्यासह अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मुंबईत भाजपाविरोधात पोस्टरबाजी सुरु केली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या