वांद्रे पूर्वेकडील स्कायवॉक राहणार ३ महिने बंद

मुंबईतल्या वांद्रे पूर्व येथील स्कायवॉकच्या नंदादीप ते एसआरए इमारतीपर्यंतचा भाग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

SHARE

मुंबईतल्या वांद्रे पूर्व येथील स्कायवॉकच्या नंदादीप ते एसआरए इमारतीपर्यंतचा भाग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) ते वरळी सी-लिंक उड्डाणपूलाच्या बांधकामासाठी २५ मार्चपासून २४ जूनपर्यंत हा स्कायवॉक बंद ठेवला जाणार येणार आहे. त्यामुळे या स्कायवॉकवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. 


पुलाच्या बांधकामासाठी  

वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) ते वरळी सी-लिंक या उड्डाणपुलाच्या २ मार्गिका असणार आहेत. वरळी सी-लिंकपासून बीकेसीपर्यंत येणारी मार्गिका ७८० मीटर लांब असेल, तर बीकेसीपासून वरळी सी-लिंकपर्यंत जाणारी मार्गिका ७२० मीटर लांब असणार आहे. तसंच, या दोन्ही मार्गिकांवर २ लेन असणार आहेत.


वाहतूककोंडीतून सुटका

दरम्यान, वांद्रे स्थानकातून अथवा वांद्रे पश्चिम येथून बीकेसीला जाण्याच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी असते. मात्र, या उड्डाणपुलामुळे प्रवाशांना बीकेसीपर्यंत लवकर पोहोचता येणार आहे.हेही वाचा -

मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा स्वगृही परतणारसंबंधित विषय
ताज्या बातम्या