Advertisement

प्रवीण छेडा स्वगृही परतणार?

मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये भाजपात प्रवेश करणार आहेत.

प्रवीण छेडा स्वगृही परतणार?
SHARES

लोकसभा निवडणूक तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांमधलं इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरु आहे. काही दिवसांपूर्वी सुजय विखे आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर, आता मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. चर्चगेटमधील गरवारे क्लबमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रविण छेडा पक्षप्रवेश करतील.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत घाटकोपरमधून प्रवीण छेडा काँग्रेसच्या तिकीटावर उभे राहिले होते. त्यावेळी सर्वात श्रीमंत उमेदवार असलेल्या भाजपाच्या पराग शाह यांनी त्यांचा पराभव केला होता. दरम्यान, मंत्री प्रकाश मेहता यांच्यासोबत असलेल्या मतभेदांमुळे प्रवीण छेडा यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. 


ईशान्य मुंबईतून कोण ?

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने गुरुवारी उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, ईशान्य मुंबईतील उमेदवार घोषित केला नाही. त्यामुळे या जागेवर प्रवीण छेडा हे किरीट सोमय्या यांना लोकसभा निवडणुकीसाठी पर्याय असल्याचीही जोरदार चर्चा आहे. तसंच, किरीट सोमय्या विद्यमान खासदार असून युतीतील मित्रपक्ष शिवसेनेचा सोमय्यांना विरोध आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईची उमेदवारी कोणाला मिळणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा -

'तुमचा पाळणा कधी हलणार'?, राष्ट्रवादीचा भाजपाला सवाल

धूलिवंधनाच्या मजेसाठी कळंब समुद्रात गेलेल्या ५ जणांचा बुडून मृत्यू



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा