Advertisement

‘अलिबागवरून आलायस का?’ म्हणण्यावर बंदी घाला; हायकोर्टात याचिका

अलिबाग हे महाराष्ट्रातील एक पर्यटन स्थळ असून या ठिकाणची साक्षरताही अधिक आहे. याव्यतिरिक्त अलिबागला एक इतिहास आणि संस्कृतीदेखील आहे. अलिबागवरून आलायस का? या वाक्यामुळं अलिबागची बदनामी होत असल्याचं ठाकूर यांचं म्हणणं आहे.

‘अलिबागवरून आलायस का?’ म्हणण्यावर बंदी घाला; हायकोर्टात याचिका
SHARES

आजवर अनेक चित्रपटांमध्ये किंवा नेहमीच्या बोलण्यात एखाद्याची थट्टा करायची असल्यास त्याला अलिबागवरून आलायस का? असं विचारलं जातं. म्हणजेच प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या त्याला वेड्यात काढलं जात.  पण यापुढे जर कुणी या शब्दाने एखाद्याची टिंगल टवाळी केली तर समोरच्याला तुरूंगातही जावं लागू शकतं. होय, हे अगदी खरंय. या वाक्यावर बंदी घालण्यासाठी अलिबागमध्ये राहणाऱ्या एका स्थानिकानं मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. ''अलिबागवरून आलायस का?'' हे वाक्य अपमान करणारं असून त्यावर बंदी घालण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आलीय.


... म्हणून बंदी घाला ?

अलिबाग वरून आलायस का? हे वाक्य एखादी व्यक्ती मूर्ख आहे असं दाखवण्यासाठी वापरण्यात येतं. त्यामुळे अलिबागमध्ये राहणाऱ्या राजेंद्र ठाकूर यांनी या वाक्यावर बंदी घालण्यासाठी याचिका दाखल केली आहे. राजेंद्र ठाकूर हे काँग्रेसचे माजी आमदार मधूकर ठाकूर यांचे पूत्र आहेत. अलिबागच्या रहिवशांसाठी हे अपमानकारक असून त्या ठिकाणचे नागरिक अशिक्षित असल्याचं सांगण्यासाठी या वाक्याचा उपयोग केला जातो, असं ठाकूर यांचं म्हणणं आहे.


अलिबागची बदनामी

अलिबाग हे महाराष्ट्रातील एक पर्यटन स्थळ असून या ठिकाणची साक्षरताही अधिक आहे. याव्यतिरिक्त अलिबागला एक इतिहास आणि संस्कृतीदेखील आहे. अलिबागवरून आलायस का? या वाक्यामुळं अलिबागची बदनामी होत असल्याचं ठाकूर यांचं म्हणणं आहे. त्यामुळं या वाक्याचा वापर बंद करण्याची मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.




हेही वाचा -

जीवघेणा स्टंट बेतला जीवावर, दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा