गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वपूर्ण ठरतात. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे (CCTV camera) गुन्हेगाराचा शोध घेणे सोयीचे झाले आहे. यापुढे राज्यात (maharashtra) शहरी भाग ते ग्रामीण भागापर्यंत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे विस्तारले जात आहे.
विशेष म्हणजे हायटेक सीसीटीव्ही ‘एआय’शी जोडले जाणार आहे. गुन्हेगार, गुन्ह्यात वापरली जाणारी गाडी याचा संपूर्ण डेटा काही वेळात पोलिसांना उपलब्ध होणार आहे, अशी माहिती राज्याच्या गृह विभागातील अधिकाऱ्याने दिली.
तसेच यापुढे खासगी आस्थापनांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात येणार आहेत. यासाठी पॉलिसी निश्चित करण्यात येत आहे.
गुन्हा कधी घडणार हे कोणी सांगू शकत नाही, परंतु गुन्हेगाराला जेरबंद करणे यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वपूर्ण ठरतात.
गुन्हेगार कोण याची ओळखत पटते, गुन्ह्यांसाठी कुठली शस्त्रे वापरली, गुन्ह्यांसाठी गाडीचा वापर केला का?, या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे सहज होतो आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे शक्य होते.
मात्र आता एआय तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्याशी एआय तंत्रज्ञान जोडल्यास त्या गुन्ह्यात कोण होता?, तो कुठे कुठे गेला?, गाडी कुठून कुठपर्यंत गेली? हा सगळा डेटा काही वेळात पोलिसांना उपलब्ध होणार आहे.
यामुळे गुन्हेगाराला (criminals) वेळीच जेरबंद करणे शक्य होणार आहे. पोलिसांना गुन्हेगाराविरोधात ठोस पुरावा जमा करणे अधिकच सोयीचे होणार आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे एआयशी लिंक करण्यात येणार असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईसह (mumbai) राज्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. गुन्हेगारीचा पर्दाफाश करण्यात सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वपूर्ण असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे विस्तारले जात आहे.
यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. खासगी आस्थापना, दुकाने, कार्यालये आदींना सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातात. मात्र देखभालीकडे दुर्लक्ष केले जाते. सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कुठे बसवावेत, सीसीटीव्हीची देखभाल कोणी करायची ही मोठी समस्या आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखभाल कोणी करायची, सीसीटीव्ही कॅमेरा एकाच यंत्रणेकडे देणे याविषयी अभ्यास सुरू आहे. यासाठी पॉलिसी विकसीत करण्याचे काम सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर पॉलिसीबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
गर्दीचे ठिकाण, धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असणे गरजेचे आहे. राज्यात 1200 पोलीस स्टेशन अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
तसेच काही ठिकाणी नव्याने बसवण्याचे काम सुरू आहे. परंतु सीसीटीव्ही कॅमेरे आणि एआय तंत्रज्ञान जोडले गेले तर गुन्ह्यांचा सखोल तपास करणे शक्य होणार आहे.
हेही वाचा