Advertisement

बेलापूर उरण मार्गावर दोन नवीन स्थानके

उरण मार्गावर दीड तासाच्या अंतराने लोकल उपलब्ध आहे. यामुळे लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती.

बेलापूर उरण मार्गावर दोन नवीन स्थानके
SHARES

मध्य रेल्वेच्या (central railway) बेलापूर-उरण (uran) रेल्वेमार्गावरील प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने या मार्गावर 10 फेऱ्या वाढवण्याचे नियोजन पूर्ण केले आहे. त्याच बरोबर तारघर आणि गव्हाण या दोन रेल्वे स्थानकांची कामेदेखील पूर्ण झाली आहेत.

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, लोकल फेऱ्यांच्या वाढीसह नवी स्थानके याच महिन्यात सुरू करण्याच्या हालचाली मध्य रेल्वेकडून सुरू झाल्या आहेत.

नवी मुंबई (navi mumbai) विमानतळाच्या जवळ तारघर रेल्वे स्थानक असल्याने त्याचा फायदा प्रवासी आणि विमानतळ (airport) कर्मचाऱ्यांना होणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर, ट्रान्स हार्बरच्या तुलनेत सीवूड बेलापूर-उरण मार्गावर लोकल फेऱ्या अत्यंत कमी आहेत. उरण मार्गावर प्रवासी संख्या वाढत असतानाही, लोकल फेऱ्या वाढवण्यात आलेल्या नाहीत.

उरण मार्गावर दीड तासाच्या अंतराने लोकल उपलब्ध आहे. यामुळे लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती. 

सीवूड-बेलापूर-उरण मार्गावर पाच अप आणि पाच डाउन लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहे. त्याचे नियोजन पूर्ण झाले आहे.

यासह तारघर (targhar) आणि गव्हाण ही दोन स्थानकेदेखील सुरू करण्यात येणार आहेत. दोन्ही रेल्वे स्थानकांतील कामे पूर्ण झाली आहेत. याच महिन्यात लोकल फेऱ्या आणि स्थानके एकाचवेळी खुली करण्यात येणार आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गव्हाण रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृह, फलाट, तिकीट घर, वाहनतळ यांची कामे पूर्ण झाली आहे. किरकोळ कामे विद्यमान सुरू आहेत. तरघर आणि गव्हाण या स्थानकांची उभारणी सिडकोने केली आहे.

सीवूड-बेलापूर-उरण मार्गावर सुरुवातीला 10 अप आणि 10 डाउन लोकल फेऱ्या वाढवण्याचे नियोजन होते. मात्र प्रवासी तिकीट विक्री आणि प्रवासी संख्या लक्षात घेता एकूण 10 लोकल फेऱ्या वाढवण्यावर एकमत झाले आहे.

यामुळे उरण मार्गावरील विद्यमान एकूण फेऱ्यांची संख्या 40 वरून 50 वर पोहोचेल. वाढीव फेऱ्यांमुळे दोन फेऱ्यांमधील अंतर कमी होण्यास मदत होणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.



हेही वाचा

उबेर ॲपवर मिळणार मेट्रोचे तिकीट

उच्च न्यायालय: मृत्यूपत्राच्या माध्यमातून भाडेकरार होऊ शकत नाही

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा