Advertisement

उबेर ॲपवर मिळणार मेट्रोचे तिकीट

यामुळे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी आता लांब रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. तसेच सर्व काम एकाच ॲपवर होणार आहे.

उबेर ॲपवर मिळणार मेट्रोचे तिकीट
SHARES

मुंबईत (mumbai) आता उबर ॲपवर मेट्रोचे तिकीट (metro tickets) मिळणार आहे. मुंबई मेट्रो लाईन 1 चे तिकीट आता उबर ॲपवर उपलब्ध झाले आहे. उबरने ही सुविधा मुंबईत पहिल्यांदाच सुरू केली आहे.

यापूर्वी दिल्ली आणि चेन्नईमध्येही अशी सुविधा सुरू झाली होती. यामुळे मुंबईतील प्रवाशांना आता उबर ॲप न सोडता मेट्रोचे तिकीट खरेदी करता येईल.

तिकीट खरेदी करणे सोपे होईल आणि लांब रांगा टाळता येतील. उबर, मुंबई मेट्रो वन आणि ONDC Network यांच्या भागीदारीमुळे हे शक्य झाले आहे.

या नवीन सुविधेमुळे अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तिकीट काढण्यासाठी आता लांब रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. तसेच सर्व काम एकाच ॲपवर होणार आहे.

उबर इंडियाच्या (UBER) आणि साउथ आशियाच्या Director Consumer Growth, शिव शैलेन्द्रन यांनी या बद्दल बोलताना सांगितले की, "मुंबईत उबर ॲपवर मेट्रो तिकीट सुविधा आणल्यामुळे प्रवाशांना कमी प्रतीक्षा करावी लागेल, कमी त्रास होईल आणि प्रवासावर अधिक नियंत्रण मिळेल."

ONDC च्या Senior Executive Director, नितीन नायर हे सुद्धा या बद्दल म्हणाले, "उबर ॲपवर ONDC नेटवर्कच्या माध्यमातून मेट्रो तिकीट सुविधा एकत्र करणे हे दाखवते की भारतातील डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर कसे दैनंदिन सोयीसाठी मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरते आहे. दिल्ली आणि चेन्नईनंतर, आम्हाला आनंद आहे की मुंबईकरांसाठी उबरद्वारे ॲपमध्ये तिकीट सुविधा सुरू करत आहोत, जे सार्वजनिक वाहतुकीसाठी खुले डिजिटल पर्यावरण अधिक मजबूत करेल."



हेही वाचा

उच्च न्यायालय: मृत्यूपत्राच्या माध्यमातून भाडेकरार होऊ शकत नाही

'खान'ला मुंबईचा महापौर होऊ देणार नाही: अमित साटम

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा