मुंबई (mumbai) शहर आणि उपनगरात मुस्लीम बांधवांच्या ईद-ए-मिलाद सणाच्या सुट्टी (holiday) दिवसात बदल करण्यात आला आहे. शुक्रवार पाच सप्टेंबर ऐवजी सोमवार आठ सप्टेंबर रोजी मुंबईत सार्वजनिक सुट्टी मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात अधिसूचना काढली आहे. महाराष्ट्र शासनाने 2025 सालासाठी राज्यात एकूण 24 सार्वजनिक सुट्टया डिसेंबर 2024 मध्ये जाहीर केल्या होत्या.
राज्य (maharashtra) सरकारने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्टयांपैकी ईद-ए-मिलादची (Eid-E-Milad) सुट्टी शुक्रवार, दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी दर्शवली आहे. ईद-ए-मिलाद हा धार्मिक सण मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात साजरा करतो. यानिमित्ताने जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
6 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशीचा हिंदू सण असल्याने राज्यात बंधुता आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी 21 ऑगस्ट 2025 रोजी विविध मुस्लिम संघटनांची बैठक झाली. या बैठकीत मुस्लिम समुदायाने सोमवार, दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता महाराष्ट्र सरकारने विशेष अधिकारांचा वापर करुन मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये शुक्रवार 5 सप्टेंबर ऐवजी सोमवार 8 सप्टेंबर 2025 हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करण्यात येत आहे.
मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवार 5 सप्टेंबर ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत आहे.
हेही वाचा