Advertisement

136 किमीचे नवीन ट्रॅक बांधण्यास मान्यता

14,907 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.

136 किमीचे नवीन ट्रॅक बांधण्यास मान्यता
SHARES

मुंबई (mumbai) शहरी वाहतूक प्रकल्प (MUTP-3B) अंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळाने प्रस्तावित केलेल्या 136.652 किमी लांबीच्या आणि 14,907 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली.

या खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच 7,453 कोटी 73 लाख रुपये खर्च (Fund) करण्यासही मान्यता देण्यात आली.

मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प-3B अंतर्गत, बदलापूर-कर्जत (32.46 किमी) दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग, आसनगाव कसारा (34.966 किमी) दरम्यान चौथा रेल्वे मार्ग आणि पनवेल ते वसई (69.226 किमी) दरम्यान एक नवीन उपनगरीय रेल्वे मार्ग (tracks) बांधण्यात येईल.

हा उपनगरीय रेल्वे प्रकल्प मुंबई रेल्वे विकास महामंडळ बांधणार आहे. हा प्रकल्प "तातडीचा सार्वजनिक प्रकल्प" आणि "महत्वाकांक्षी शहरी वाहतूक प्रकल्प" म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आली.

तसेच, वांद्रे (पूर्व) येथील रेल्वे जमिनीच्या विकासातून उपलब्ध होणाऱ्या निधीपैकी 50 टक्के निधी राज्य सरकारच्या वाट्यानुसार आवश्यकतेनुसार समायोजित केला जाईल आणि उर्वरित निधी शहरी वाहतूक निधी (UTF) मध्ये जमा केला जाईल.

याशिवाय, केंद्राला MUTP-2 सारख्या या प्रकल्पातून रेल्वे तिकिटांवर अधिभार आकारण्याची आणि ही रक्कम राज्य सरकारच्या शहरी वाहतूक निधीमध्ये जमा करण्याची विनंती केली जाईल.



हेही वाचा

पनवेल ते चिपळूण दरम्यान विशेष मेमू

संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेत 1,000 रुपयांची वाढ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा