आषाढी एकादशी आणि बकरी ईदनिमित्त 'या' बस मार्गांमध्ये बदल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आणि बकरी ईद (Bakri Eid) महाराष्ट्रात (Maharashtra) साजरी केली जात आहे. दोन्ही सणांच्या निमित्ताने बेस्ट बसच्या (Best bus) काही मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 

आषाढी एकादशीनिमित्त पोलिसांनी कात्रक रोड बंद केला आहे. त्यामुळे रात्रीपासून बस मार्ग 411 च्या बस गाड्या वडाळा स्थानक मार्गे व बस मार्ग 67, 169 ,172 व 165 बस गाड्या लेडीज जहांगीर मार्ग पाच उद्यान रुईया कॉलेज बीए रोडवरून दोन्ही दिशेमध्ये परावर्तित करण्यात आलेल्याआहेत.

गोवंडी स्टेशन येथे बकरा बाजार भरल्यामुळे बस मार्ग क्रमांक A 357 ए 375,A 376 हे टाटानगर स्टॉपनंतर जिजामाता भोसले मार्गाने फ्री वे जंक्शन नंतर ए 19 च्या मार्गाने सम्राट अशोक नगर व पुढे नियोजित मार्गाने जातील.

बकरा बाजार भरल्यामुळे बस मार्ग क्रमांक 8 आणि 383 या दोन्ही दिशेने शिवाजी नगर जंक्शन येथून थेट सम्राट अशोक नगर असे परावर्तित केले आहेत. 


हेही वाचा

मागाठाणे मेट्रोच्या प्रवाशांनो 'हे' बदल जाणून घ्या

Bakri Eid: रहिवाशी संकुलात बकऱ्यांच्या कुर्बानीला बंदी, हायकोर्टाचे निर्देश

पुढील बातमी
इतर बातम्या